विज्ञान-तंत्र

Motorola ने लॉंच केला 200MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा नवा व्हेरिएंट; वाचा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Motorola ने काही आठवड्यांपूर्वी भारतात आपला 200-मेगापिक्सेल कॅमेरा स्मार्टफोन Moto Edge 30 Ultra लॉन्च केला होता. कंपनीचा हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. आता मोटोरोलाने या फोनचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहे. हा 12 GB रॅम आणि 256 GB इंटरनल स्टोरेजसह येतो. नवीन व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. फोन फ्लिपकार्टवर लिस्च करण्यात आला आहे. त्याची विक्रीही लवकरच सुरू होईल, असे मानले जात आहे. फोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ते अजूनही 8GB रॅम व्हेरिएंट सारखेच आहेत.

Moto Edge 30 Ultra ची फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये 2400x1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.67-इंचाचा फुल HD + POLED डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 144Hz च्या रीफ्रेश रेट आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे आणि पीक ब्राइटनेस लेव्हल 1250 nits आहे. फोन 12GB पर्यंत LPDDR 5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज आहे. Android 12 OS वर काम करणाऱ्या या फोनमध्ये तुम्हाला Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळेल.

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 200-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 12-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. फोनमध्ये दिलेल्या 200-मेगापिक्सेल प्राइमरी कॅमेऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो.

सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 60-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेला हा फोन 4610mAh बॅटरीने सपोर्टेड आहे. ही बॅटरी 125 W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनची खास गोष्ट म्हणजे यात 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे. Moto च्या लेटेस्ट 5G फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6, Bluetooth 5.2, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे फीचर्स दिले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT