Motorola Edge 50 Launched in India esakal
विज्ञान-तंत्र

Motorola Edge 50 Launch : मोटोरोलाच्या नव्या फोनची आज मार्केटमध्ये झाली एन्ट्री; जबरदस्त फीचर्स अन् ब्रँड कॅमेरा क्वालिटी, किंमतसुद्धा कमी

Saisimran Ghashi

Motorola Edge 50 : भारतात स्मार्टफोन मार्केटमध्ये नव्याने एन्ट्री मारली आहे मोटोरोलाच्या एज 50 ने (Motorola Edge 50). कंपनीने १ ऑगस्टला (गुरुवारी) या फोनचे भारतात लाँच केले. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा सोनी-लिटिया ७००सी प्राइमरी कॅमेरा आणि १० मेगापिक्सेलचा टेलीफोटो शूटर आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जेन १ अॅक्सेलरेटेड एडिशन चिपसेट आणि ८ जीबी रॅमची जोडी आहे.

मोटोरोला एज 50 ची किंमत भारतात २७,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या अधिकृत वेबसाइटवरून विक्रीसाठी उपलब्ध असेल. ग्राहकांना बँक ऑफर्सही देण्यात येत आहेत. या फोनमध्ये जंगल ग्रीन, पँटोन पीच फज्ज आणि कोआला ग्रे असे तीन रंगांचे पर्याय आहेत.

या फोनमध्ये ६.७ इंचचा १५०० निट्स पीक ब्राइटनेस असलेला सुपर एचडी पीओएलईडी कर्व्ड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे जी ६८ वॅट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये आईपी ६८ रेटिंग आहे आणि ते मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशनसह येते.

सर्वात महत्वाचे म्हणजे हा फोन सेगमेंटमधील सर्वात पातळ एमआयएल-८१० एच रेटेड कर्व्ड स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे.

या फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि ५ जी, ४ जी एलटीई, वाय-फाय ६ ई, ब्लूटूथ ५.२, एनएफसी, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी कनेक्टिव्हिटी आहे.

अशा प्रकारे मोटोरोलाने एप्रिलमध्ये देखील त्यांचा नवीन मोबाईल लॉंच केला होता. आता या नवीन फोनमध्ये देखील कंपनीने जबरदस्त फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन लोकांच्या किती पसंतीस उतरतोय हे पाहणे मनोरंजक असेल. या फोनमुळे स्मार्टफोन बाजारात नक्कीच चांगली स्पर्धा निर्माण होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra weather update: शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! राज्यात पुन्हा सक्रिय पावसाची शक्यता, पुणे-मुंबईत काय असेल परिस्थिती?

आजचे राशिभविष्य - 20 सप्टेंबर 2024

अग्रलेख : एकदाच काय ते...

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT