Mukesh Ambani backed AI model Reliance's Hanooman to launch in March Sakal
विज्ञान-तंत्र

Hanooman AI: AIच्या जगात अंबानींच्या 'हनुमान'ची होणार एन्ट्री; काय आहे या अफाट चॅटबॉटची ताकत?

Reliance's Hanooman AI: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुढील महिन्यात (मार्च 2024) 'हनुमान' हा ChatGPT सारखा AI चॅटबॉट लॉन्च करणार आहेत. ते तयार करण्यासाठी, कंपनी देशातील 8 आयआयटी विद्यापीठांसोबत हा चॅटबॉट तयार करत आहे.

राहुल शेळके

AI Chatbot Hanuman: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुढील महिन्यात (मार्च 2024) 'हनुमान' हा ChatGPT सारखा AI चॅटबॉट लॉन्च करणार आहेत. ते तयार करण्यासाठी, कंपनी देशातील 8 आयआयटी विद्यापीठांसोबत हा चॅटबॉट तयार करत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि देशातील 8 IITचे पाठबळ असलेल्या BharatGPT ग्रुपने मुंबईतील एका तंत्रज्ञान परिषदेदरम्यान हा AI चॅटबॉट प्रदर्शित केला. (Know What Is Hanooman AI)

या कॉन्फरन्सदरम्यान एका व्हिडिओमध्ये, दक्षिण भारतातील एका मोटरसायकल मेकॅनिकने तमिळ भाषेत एआय बॉटशी संवाद साधला. याव्यतिरिक्त, एका बँकरने बॉटशी हिंदीमध्ये संवाद साधला आणि हैदराबादमधील एका व्यक्तीने संगणक कोड लिहिण्यासाठी बॉटचा वापर केला.

हनुमान AI मॉडेल कसे आहे?

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार या एआय मॉडेलला हनुमान असे नाव देण्यात आले आहे. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर ते भारतासाठी AI च्या जगात मैलाचा दगड ठरेल. (How is the Hanooman AI model?)

आयआयटी बॉम्बेच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष गणेश रामकृष्णन म्हणाले की, हे एलएलएम (लार्ज लँग्वेज मॉडेल) आहे. लार्ज लँग्वेज मॉडेल हे मोठ्या डेटासेटचा वापर करून प्रशिक्षित केला जातो.

भारत जीपीटीचे हे मॉडेल हेल्थ केअर, गव्हर्नन्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि एज्युकेशन या चार मुख्य क्षेत्रात 11 स्थानिक भाषांमध्ये काम करेल. हनुमान मॉडेल तयार करण्यात आयआयटी मुंबईचाही सहभाग आहे. याला Reliance Jio Infocomm Limited आणि भारत सरकारचाही पाठिंबा आहे. याशिवाय रिलायन्स जिओ ब्रेनवरही काम करत आहे.

मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत समावेश

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीत सामील झाले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 114 अब्ज डॉलर (सुमारे 9.45 लाख कोटी रुपये) झाली आहे. (Mukesh Ambani included in the list of top 10 richest people in the world)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत आणि त्यांनी Google सह-संस्थापक सर्गे ब्रिन यांना मागे टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT