Reliance AGM 2024 Mukesh Ambani Unveils Jio AI-Cloud With 100 GB Free Storage esakal
विज्ञान-तंत्र

Reliance AGM 2024 Live : Jio यूजर्ससाठी खुशखबर! आता मिळणार तब्बल 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज,मुकेश अंबानींची मोठी घोषणा

Saisimran Ghashi

Reliance AGM 2024 Announcements : मुकेश अंबानी यांनी रिलायन्स AGM 2024 मध्ये Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. Jio AI-Cloud Welcome ऑफर अंतर्गत Jio यूजर्सना तब्बल 100 GB मोफत क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. याचा अर्थ असा की Jio यूजर्स आता त्यांचे सर्व फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर महत्वाची डिजिटल माहिती सुरक्षितपणे साठवू शकतील आणि त्यांना कधीही, कुठूनही ॲक्सेस करू शकतील.

“Jio AI-Cloud Welcome ऑफरची घोषणा करायला मला खूप आनंद होत आहे,” असे मुकेश अंबानी म्हणाले. या ऑफर अंतर्गत Jio यूजर्सना 100 GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज मिळणार आहे. त्यामुळे ते त्यांचे सर्व फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स आणि इतर महत्वाची डिजिटल माहिती सुरक्षितपणे साठवू शकतील आणि त्यांना कधीही, कुठूनही ॲक्सेस करू शकतील. आम्ही यंदा दिवाळीपासून Jio AI-Cloud Welcome ऑफर लाँच करण्याची योजना करीत आहोत. या ऑफरद्वारे आम्ही एक प्रभावी आणि स्वस्त पर्याय उपलब्ध करून देत आहोत, ज्या अंतर्गत सर्वांना आणि सर्वत्र क्लाउड डेटा स्टोरेज आणि डेटा-वर आधारित AI सेवांचा लाभ घेता येईल,असेही त्यांनी सांगितले.

Jio AI-Cloud Welcome ऑफर ही खरोखर आकर्षक आहे. यामुळे अनेक Jio यूजर्स खूश होणार आहेत यात शंका नाही. मोफत क्लाउड स्टोरेज मिळाल्यामुळे आता यूजर्सना त्यांच्या फोनची स्टोरेज संपण्याची चिंता करण्याची गरज नाही. Jio AI-Cloud बद्दल अधिक माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खळबळ! शहराध्यक्ष भगवान भालेराव यांची रिपब्लिकन आठवले पक्षातून हकालपट्टी

IND vs BAN: धावा नाही केल्या तरी काय झालं? Virat Kohli च्या नागीन डान्सवर चाहते खूश, पाहा व्हिडिओ

Bigg Boss Marathi 5: दोनच आठवड्यात Sangram Chougule यांनी घेतला बिग बॉसचा निरोप, कॅप्टन्सी टास्क पडला महागात

Sakal Maratha Samaj: सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल; CM एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाला घालणार घेराव

सत्ताधारी-विरोधक राजकारणात व्यस्त; मुद्द्यापासून वेगळीकडे लक्ष वळवण्याचं काम सुरू, वरळीत राज ठाकरेंचं शरसंधान

SCROLL FOR NEXT