विज्ञान-तंत्र

'कनेक्टिंग विथ चांदोमामा', अशक्यही शक्य करणारे निशांत बत्रा कोण?

सकाळ डिजिटल टीम

चंद्रावर मानव मिशनच्या तयारीत नासा

४जी नेटवर्क बनविण्याची जबाबदारी नोकियावर

निशांत बत्रा आहेत ग्लोबल स्टॅट्रर्जी आणि टेक्नोलॉजी हेड

बेल लॅब्समध्ये टेक्नोलॉजी आणि रिसर्चची जबाबदारी

आता तो दिवस दूर नाही जेव्हा चंद्रावर किंवा मंगळावर जाणाऱ्या अंतराळ प्रवासी आपल्या घरी फोन करून संपर्क साधू शकतात. एवढेच नव्हे तर ते आपल्या फोन व्हर मुव्ही आणि व्हिडिओ देखील पाहू शकतो. अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA)चंद्रावर मानवाला पाठवण्याची मोहिम आखत आहे. त्यांनी चंद्रावर ४ जी नेटवर्क प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची जबाबदारी नोकिया (nokia) कंपनीवर सोपवली आहे. याची धूरा एका भारतीयाच्या हातात दिली अून निशांत बत्रा (Nishant Batra)असे त्यांचे नाव आहे. दिल्लीतील एका मध्यमवर्गातील व्यावसायिक कुटांबातील ते आहेत. (Nakia's Nishant Batra setting up first 4G network on Moon for NASA)

फिनलॅन्डच्या इस्पूमध्ये राहाणाऱ्या निशांत २२ अरब युरोची कंपनी नोकियामध्ये(Nokia) ग्लोबल स्ट्रटर्जी आणि टेक्नोलॉजी हेड आहेत. बेल लॅब्समध्ये (Bell Labs) टेक्नोलॉजी आणि रिसर्चची जबाबदारीदेखील त्यांच्या जवळ आहे. या लॅबला नऊ नोबल पुरस्कार आणि पाच ट्युरिंक अॅवॉर्ड मिळाले आहेत. नासाने आपल्या चंद्र मोहिमेसाठी(Lunar Mission) मोबाईल कनेक्टिव्हिटी देण्याची जबाबदारी नोकिया कंपनीला सोपवली आहे.

कोण आहेत निशांत बत्रा?

सन १९४८मध्ये जन्मलेले निशांत यांनी INSEAD बिजनेस स्कूलमधून एमबीए केले. त्यांनी इंदौरच्या देवी अहिल्या युनिवर्सिटीमधून कॉप्यूटर अॅप्लिकेशनमध्ये बॅचलर डिग्री घेतल्यानंतर अमेरिकेमध्ये Southern Metodist University मध्ये कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केले आहे. निशांन यांना टेलीकॉम इंडस्ट्रीचा चांगला अनुभव आहे. एकेकाळी एका दशकापेक्षा अधिक काळासाठी एरिक्सन (Ericsson)मध्ये होते आणि २०१८मध्ये Veoneer काम करण्यास सुरूवात केलीय जानेवारी २०२०मध्ये ते नोकियासोबत जोडले गेले.

नासा ने नोकियाला ऑक्टोबर २०२०मध्ये चंद्र कनेक्टिव्हिटी (Lunar Connectivity) प्रकल्प दिला होता. नासा २०२४मध्ये चंद्रावर माणसे पाठविण्याची योजना आखत आहे. चंद्रावर आतापर्यंत केवळ नासानेच मानव मिशन पाठवले आहे. नील आर्मस्ट्रॉन्ग १९६९ मध्ये चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारे व्यक्ती होते. नासा ने आपल्या मून मिशनसाठी नोकियाने नेटवर्कचा वापर केला होता.

चंद्रावर मुव्ही आणि व्हिडिओ

चंद्रावर 4जी नेटवर्क प्रस्थापित झाल्यानंतर तिथून रेग्युरल कॉल करता येऊ शकतो. किंवा तिथे मुव्ही किंवा व्हिडिओ देखील पाहू शकता. याबाबत निशांत यांनी सांगितले की, जर चंद्रावर 4जी नेटवर्क प्रस्थापित केले तर हे डिव्हाईसी तिथेही काम करू शकतील. जर कोणी डिव्हाईल चंद्रावर घेऊन गेले तर तो आपल्या घरी कॉल करू शकतो.''

निशांत यांची टीम 6जी टेक्नोलॉजीचा देखील शोध घेत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, चंद्रावर नेटवर्क यावर्षी सत्यात उतरेल.

त्यांनी सांगितले, आमचा उद्देश पुढील काही महिन्यांमध्ये हे काम पुर्ण करणे आहे. पण हा नासाचा प्रोजेक्ट आहे त्यामुळे मी लॉन्च करण्याची तारीख सांगू शकत नाही. पण हे नक्की आहे की पुढील काही महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल. या प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत बत्रा यांनी सांगितले की, आम्हाला कोणत्याही कस्चमाईज्ड कम्युनिकेशन लिंकचा वापर करत नाही. आम्ही चंद्रावर कम्युनिकेशनसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग टेक्नोलॉजी चा वापर करत आहे. म्हणजे आम्ही चंद्रावर लिंक करण्यासाठी कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी बनवले नाही.

ते म्हणाले की, भारताचे अभियांत्रिकी आणि आयटी व्यावसायिक जगातील सर्वोत्तम प्रतिभावंतापैकी एक आहेत आणि ते भविष्यातील तंत्रज्ञान विकसित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. ते म्हणाले, 'सध्या भारत उपयोजित नवोपक्रमात उत्तम काम करत आहे. मला भारतातील बेल लॅब किंवा फंक्शनल इनोव्हेशनवर अधिक मेहनत करावी लागेल. नोकिया आणि बेल लॅब भारतातील असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानावर बोलताना राहुल गांधींचा माईक झाला बंद, सुरु होताच म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण...

Potato : सर्वांच्या लाडक्या बटाट्याचा जन्म भारतातला नाहीच ! बटाट्याच्या भाजीच्या अनेक पद्धती काय ? जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

Farmers Income: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 20,000 रुपये

IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT