NASA to Train Indian Astronauts for Joint ISS Mission esakal
विज्ञान-तंत्र

America-India Space Mission : नासा देणार भारतीय अंतराळवीरांना ट्रेनिंग ; दोन देशांची संयुक्त अंतराळ मोहीम

सकाळ डिजिटल टीम

Bengluru Conference : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA लवकरच भारतीय अंतराळवीरांना विशेष प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश्य भारतीय आणि अमेरिकन अंतराळवीर मिळून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर (International Space Station - ISS) संयुक्त मोहिमेवर जाणे हा आहे. ही माहिती अमेरिकेचे भारतीय राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी बेंगळुरू येथे झालेल्या "युएस-इंडिया कमर्शियल स्पेस कॉन्फरन्स" मध्ये दिली.

गार्सेट्टी म्हणाले, "नासा लवकरच भारतीय अंतराळवीरांना प्रगत प्रशिक्षण देणार आहे. या मोहिमेचे लक्ष्य यंदाच्या वर्षात किंवा त्याच्या पुढे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर संयुक्तपणे जाणे असा आहे. हे दोन्ही देशातील राजकीय नेत्यांच्या भेटीदरम्यान झालेल्या करारांपैकी एक महत्वाचा करार होता."

याशिवाय, "आम्ही लवकरच इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून निसार उपग्रह प्रक्षेपित करणार आहोत. या उपग्रहाद्वारे पर्यावरण, पृथ्वीचे पृष्ठभाग, नैसर्गिक आपत्ती, समुद्राची वाढती पातळी आणि हिमनदांवर (cryosphere) लक्ष ठेवता येणार आहे," असेही त्यांनी नमूद केले.

अमेरिका आणि भारत यांच्यातील अंतराळ क्षेत्रातील सहकार्याबाबत आशावाद व्यक्त करताना, युएसआयबीसीचे अध्यक्ष अतुल कशप यांनी याला अमेरिका-भारत अंतराळ संशोधन भागीदारीचे नवे पर्व असं म्हटले आहे.

अंतराळ क्षेत्रातील संशोधन आणि नावीन्यपूर्णतेमध्ये अग्रणी असलेल्या दोन देशांमधील सहकार्य वाढत असल्याचे या परिषदेतून दिसून येते. धोरणात्मक युती आणि संयुक्त प्रयत्नांद्वारे आपण असाधारण यशस्वी टप्पे गाठण्याच्या आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्राचा विस्तार करण्याच्या मार्गावर आहोत, असेही कशप यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT