Nasa Delays Sunita Williams Return Due to RCS Thruster Testing esakal
विज्ञान-तंत्र

Suinta Williams in Space : सुनीता विलियम्सचा पृथ्वीवरील परतीचा प्रवास पुन्हा लांबणीवर; नासाने सांगितेल्या कारणामुळे चिंता वाढली

Sunita Williams Earth Return Delay : नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि सहकारी अंतराळवीर बुच विलमोर हे 5 जूनपासून अंतराळ स्थानकावर आहेत. अश्यात यांच्या पृथ्वीवर परतीला अजून थोडा उशीर होणार आहे आणि ते जुलै महिन्यात पृथ्वीवर परत येणार नाहीत.अशी माहिती समोर आली आहे.

Saisimran Ghashi

Sunita Williams Latest Update : नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि सहकारी अंतराळवीर बुच विलमोर हे 5 जूनपासून अंतराळ स्थानकावर आहेत. त्यांच्या यानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अंतराळवीरांची पृथ्वीवर परती होत नाहीये. ते अंतराळ स्थानकावर अडकून आहेत. अश्यात यांच्या पृथ्वीवर परतीला अजून थोडा उशीर होणार आहे,अशी माहिती समोर आली आहे.

सुनीता विलियम्स जुलै महिन्यात पृथ्वीवर परत येणार नाहीत. स्टारलाइनर अंतराळयानाच्या इंधन प्रणालीची (रिअ‍ॅक्शन कंट्रोल सिस्टम - आरसीएस) सखोल तपासणी आणि चाचण्यांमुळे हा विलंब झाला आहे. अंतराळवीरांची सुरक्षित परती सुनिश्चित करण्यासाठी स्टारलाइनर टीम सध्या या चाचण्यांचे विश्लेषण करत आहे. यामध्ये देखील काही चिंताजनक बाबी आहेत,असे वृत्तांच्या माध्यमातून समोर आले आहे.

न्यू मेक्सिकोमधील नासाच्या व्हाइट सँड्स चाचणी केंद्रात आरसीएस इंधन प्रणालीची चाचणी केली गेली. या चाचण्यांमुळे इंधन गळतीचे मूळ कारण समजण्यास मदत झाली आहे. तसेच अंतराळयानाचे पृथ्वीवर सुरक्षित अवतरण करण्यासाठीची योजनाही आखण्यात आली आहे. स्टारलाइनर कार्यक्रमाचे प्रमुख मार्क नॅपी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले, "अंतराळवीरांना सुरक्षित परत आणण्यासाठी आमच्याकडे उत्तम यान आहे याबद्दल मला पूर्ण खात्री आहे."

अंतराळ स्थानकावर (आयएसएस) सुरक्षितरीत्या रुजु असलेल्या यानाच्या २८ पैकी २७ इंधन प्रणाली (थ्रस्टर्स) या आठवड्याच्या शेवटी "हॉट फायर" केले जाणार आहेत. या चाचण्यांच्या माध्यमातून इंधनाची कार्यक्षमता तपासण्याबरोबरच ६ जून पासून अंतराळ स्थानकावर आल्यापासून स्थिर असलेल्या हेलियम गळतीची आणखी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आहे.

नॅपी पुढे म्हणाले, "आमचे ध्येय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचवणे हे होते, ते पूर्ण झाले आहे. चाचणी उड्डाणातील माहिती मिळवणे हे देखील आमचे ध्येय होते. आता अंतराळवीरांना सुरक्षितपणे परत आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे."

या तयारीच्या कामासोबतच अंतराळयानाची देखभाल आणि यंत्रणांची चाचणीही सुरू आहे. विलमोर, विलियम्स आणि जमिनीवरील नियंत्रण केंद्र यांनी अद्यतनित अवतरण आणि लँडिंग सॉफ्टवेअर अपलोड करण्यासाठी आणि व्हेस्टा प्रतिमा डाउनलोड करण्यासाठी अंतराळयानाला सुरू केले.

विशेष म्हणजे, विल्मोर यांनी टॅब्लेट आणि जॉयस्टिकच्या मदतीने स्टारलाइनरच्या बॅकअप नियंत्रण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे.

NASA च्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे व्यवस्थापक स्टीव्ह स्टिच यांनी अंतराळवीर चांगले आहेत आणि आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरील (Expedition 71) कार्यात आनंद घेत आहेत, असे सांगितले. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांनाही दीर्घकाळाच्या अंतराळ मोहिमांचा अनुभव असल्याने त्यांना या वाढत्या मुदतीशी जुळवून घेण्यास मदत झाली आहे.

अंतराळ प्रवासादरम्यान मानवी शरीरावर होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी विल्मोर यांच्यावर अल्ट्रासाऊंड स्कॅन्सही करण्यात आले आहेत.

स्टारलाइनर क्रू फ्लाइट टेस्ट (CFT) चा लॅण्डिंगचा दिवस पुढील आठवड्यात होणाऱ्या फ्लाइट टेस्ट रेडीनेस रिव्ह्यू नंतर निश्चित केला जाणार आहे. ऑगस्ट महिन्यात लॅण्डिंगची संधी उपलब्ध आहे असे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT