Oldest Black Hole eSakal
विज्ञान-तंत्र

Oldest Black Hole : विश्वातील सर्वात जुनं ब्लॅकहोल सापडलं; नासाच्या 'चंद्र' टेलिस्कोपने केली कमाल! किती आहे दूर?

Sudesh

NASA Black Hole : नासाने एक मोठा शोध लावला आहे. पृथ्वीपासून अब्जावधी प्रकाशवर्षे दूर एका नव्या ब्लॅक होलचा शोध लागला आहे. हे आतापर्यंत मिळालेलं सर्वात जुनं ब्लॅकहोल समजलं जात आहे. बिग बँगनंतर अवघ्या काही काळानंतरच याची निर्मिती झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नासाच्या 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'ने या ब्लॅक होलच्या होस्ट गॅलेक्सीचा शोध लावला होता. यानंतर चंद्र या एक्सरे ऑब्जर्वेटरीने तपास केला असता या गॅलेक्सीमधील ब्लॅकहोल देखील दिसून आलं. जेम्स वेब टेलिस्कोपने शोधलेल्या 11 जुन्या गॅलेक्सींपैकी UHZ1 या गॅलेक्सीमध्ये हे ब्लॅकहोल दिसलं.

नासाने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. सोबतच या गॅलेक्सी आणि ब्लॅकहोलचा फोटो देखील नासाने शेअर केला आहे. ही गॅलेक्सी आणि ब्लॅकहोल पृथ्वीपासून तब्बल 13.2 बिलियन प्रकाशवर्षं दूर आहे. बिग बँगनंतर आपलं विश्व जेव्हा केवळ 470 मिलियन वर्षांचं होतं तेव्हा तयार झालेली ही आकाशगंगा असल्याचं नासाने म्हटलं आहे. (Tech News)

या संशोधनावेळी जेम्स वेब टेलिस्कोपला अशा 11 आकाशगंगा मिळाल्या आहेत, ज्या बिग बँगनंतर केवळ 1 बिलियन वर्षांमध्ये तयार झाल्या आहेत. आपली सूर्यमाला आणि पृथ्वीची निर्मिती ही साधारपणे बिग बँगनंतर 9.22 बिलियन वर्षांनंतर झाली असावी असं म्हटलं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Classical Language: मराठी भाषेला अभिजात दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Chakan MIDC: चाकणमधील 50 कंपन्या खरंच स्थलांतरित झाल्यात का? औद्योगिक विकास महामंडळाने केला खुलासा

Pune Crime : वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांकडून पित्याला अटक

Narendra Modi ५ ऑक्टोबरला ठाणे दौऱ्यावर, वाहतुकीत मोठे बदल, महत्त्वाचे रस्ते बंद, 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SSC Exam : दहावीच्या परीक्षेसाठी सोमवारपासून अर्ज भरता येणार

SCROLL FOR NEXT