NASA  sakal
विज्ञान-तंत्र

NASA : चांद्र मोहिमेचा खर्च ‘नासा’ला परवडेना! चंद्रावर संशोधनासाठीची ‘व्हायपर’ योजना रद्द करण्याचा निर्णय

चंद्रावर बग्गी (रोव्हर) उतरविण्याची ‘व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरोशन रोव्हर’ (व्हीआयपीईआर- व्हायपर) मोहीम गुंडाळण्याचा निर्णय अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) बुधवारी (ता.१७) जाहीर केला.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : चंद्रावर बग्गी (रोव्हर) उतरविण्याची ‘व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरोशन रोव्हर’ (व्हीआयपीईआर- व्हायपर) मोहीम गुंडाळण्याचा निर्णय अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) बुधवारी (ता.१७) जाहीर केला.

खर्चात झालेली वाढ, प्रक्षेपणाला विलंब आणि भविष्यात खर्च आणखी वाढण्याचा धोका असल्याने ही मोहीम रद्द करीत असल्याचे कारण ‘नासा’ने दिले आहे. यामुळे चंद्राच्या संशोधन मोहिमेला मोठा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ‘व्हायपर’साठी आतापर्यंत ४५ कोटी डॉलर खर्च करण्यात आला आहे. हा खर्च ६० कोटी ६६ लाख डॉलरपर्यंत वाढण्याचा शक्यता व्यक्त होत आहे.

ॲस्ट्रोबोटिक टेक्नॉलॉजी’ कंपनीकडून मिळालेल्या लँडरवरून ‘व्हायपर’ बग्गीचे प्रक्षेपण २०२३ च्या अखेरीस होणार होते. पण ‘ॲस्ट्रोबोटिक लँडर’च्या उड्डाणपूर्व चाचण्या घेण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याने प्रक्षेपण २०२४ अखेरपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती ‘नासा’ने २०२२ मध्ये केली होती.

त्यानंतर वेळोवेळी होणारे बदल आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे ‘व्हायपर’चे प्रक्षेपण सप्टेंबर २०२५ पर्यंत लांबले. त्याचवेळी ‘ॲस्ट्रोबोटिक’च्या ग्रिफिन लँडरवरून ‘कमर्शियल लूनार पेलोड सर्व्हिसेस’चे (सीएलपीएस) प्रक्षेपित करण्यास विलंब झाला. ‘व्हायपर’ मोहीम सुरू ठेवल्यास खर्च वाढेल आणि त्यामुळे ‘सीएलपीएस’ मोहिमा रद्द होण्याचा किंवा त्यात व्यत्यय येण्याचा धोका असल्याची कल्पना ‘नासा’ने अमेरिकेच्या सरकारला दिली होती.

मोहिमेचा उद्देश

  • चंद्राचा अभ्यास आणि सूर्यमालेतील काही मोठी रहस्ये उलगडण्यात मदत करणे

  • चंद्रावर बर्फ आणि इतर संभाव्य साधनसंपत्ती शोधणे

  • मोहीम रद्द केल्यानंतर आता ‘व्हायपर’चे भाग वेगळे करणार

  • वेगळे केलेले भाग आणि अन्य उपकरणांचा भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी वापर करणार

  • मोहीम रद्द करण्यासारखे निर्णय घेणे सोपे नसते.पण ‘व्हायपर’च्या वाढत्या खर्चामुळे अन्य मोहिमा थांबविण्याच्या किंवा पुढे ढकलाव्या लागल्या असत्या.

  • - निकोला फॉक्स, सहाय्यक प्रशासक, वैज्ञानिक मोहीम संचालनालय, ‘नासा’

  • रोव्हरची पूर्ण तयारी झाली होती. मात्र त्याच्या चाचण्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्याचे प्रक्षेपण योग्य प्रकारे होऊ शकेल, याची खात्री देता येत नव्हती.

  • - जोएल क्रियन्स, उपसहाय्यक प्रशासक, संशोधक विभाग, ‘नासा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT