NASA big Announcement Esakal
विज्ञान-तंत्र

NASA big Announcement: इस्रोच्या अंतराळवीरांना नासा अंतराळ केंद्रात पाठवणार! तयारी सुरू, मोहिमेची तारीख देखील ठरली ?

अंकिता खाणे (Ankita Khane)

अंतराळ क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि अमेरिका अनेक पावले उचलणार आहेत. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी सांगितले की, अमेरिकन अंतराळ संस्था इस्रोच्या एका अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात राहण्यासाठी प्रशिक्षण देईल. क्रिटिकल अँड ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (iCET) ला प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र पुढे जातील. ते पुढे म्हणाले, गेल्या वर्षी आम्ही भारतात गेलो होतो. मानवतेच्या भल्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करण्यास तयार आहेत.

आम्ही अंतराळ क्षेत्रात एकत्र काम करू आणि इस्रोच्या एका अंतराळवीराला ISS मध्ये जाण्यासाठी, तिथे राहण्यासाठी आणि परत येण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे भविष्यात अवकाश विज्ञानाला प्रगती होण्यास मदत होईल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी याबाबतची माहिती सांगितली आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे समकक्ष जेक सुलिव्हन यांच्यातील बैठकीनंतर नेल्सन यांनी हे सांगितले. इस्रोच्या अंतराळवीरांना प्रगत प्रशिक्षण दिले जाईल, असे सुलिव्हन यांनी सोमवारी सांगितले होते.

बिल नेल्सन म्हणाले की, नासा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात भारतीय अंतराळवीरांसोबत संयुक्त मोहिमेचे आयोजन करेल. दोन्ही NSA ने अंतराळ उड्डाण सहकार्य आणि धोरणात्मक विकासासाठी चर्चा केली. नासा आणि इस्रोच्या अंतराळवीरांचा हा पहिलाच संयुक्त प्रयत्न असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतीय अंतराळवीर ISS मध्ये जाण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणासाठी इस्रो चार अंतराळवीरांची निवड करू शकते.

NASA आणि ISRO मिळून ISRO Synthetic Aperture Radar म्हणजेच NISAR लॉन्च करणार आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरू शकते. ते दर 12 दिवसांनी दोनदा पृथ्वीचा नकाशा तयार करेल. जेक सुलिवन आणि NSS अजित डोवाल यांच्यातील संभाषणानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. हा उपग्रह नासा आणि इस्रोने संयुक्तपणे तयार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT