National Space Day  esakal
विज्ञान-तंत्र

National Space Day : अमेरिकेला 5 प्रयत्नात जे जमलं नाही ते भारतानं पहिल्याच फटक्यात करून दाखवलं; ISRO बद्दल तुम्हाला माहितीयेत का या गोष्टी?

Intresting Facts About ISRO : ISRO बद्दलच्या ‘या’ गोष्टी प्रत्येक भारतीयाला माहिती असायलाच हव्यात!

सकाळ डिजिटल टीम

National Space Day :

आज भारतीय अंतराळ दिवस आहे. २३ ऑगस्ट २०२३ हा दिवस राष्ट्रीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. भारताने या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश ठरला त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जातो.

२०२३ मध्ये केलेल्या या कामगिरीवेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिलाच देश भारत बनला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे.

आजच्या या दिवसाचे औचित्य साधून आपण भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. एक भारतीय म्हणून आपल्याला या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.  

इस्त्रोची स्थापना कधी झाली

विक्रम साराभाई यांनी रशियन क्षेपणास्त्र स्पुटिकच्या प्रक्षेपणानंतर भारतात अंतराळ कार्यक्रम स्थापित करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना केली. साराभाईंच्या प्रयत्नांमुळे १९६९ मध्ये भारताच्या इस्रोची स्थापना झाली. ते इस्रोचे पहिले अध्यक्ष होते. विक्रम साराभाई यांनीच भारत सरकारला स्वतःचा अवकाश कार्यक्रम सुरू करायला हवा असे पटवून दिले.

ISRO चे पूर्ण नाव Indian Space Research Organisation (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) असे आहे. भारतात इस्त्रोचे एकूण १३ केंद्र आहेत. पृथ्वीवर सॅटेलाईट बनवून तो यशस्वीरित्या अंतराळात पोहोचवणाऱ्या ६ देशात (अमेरिका, रशिया, फ्रांस, जापान, चीन आणि भारत) आपल्या भारताचेही नाव आहे.

इस्त्रोने आजवर २१ वेगवेगळ्या देशांसाठी ७९ उपग्रह लॉन्च केले आहेत. तसेच, भारतासाठी ८६ उपग्रह अवकाशात सोडले आहेत.भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट असे होते. तो   १९ एप्रिल १९७५ रोजी लॉन्च करण्यात आला होता.

पहिल्याच प्रयत्नात मंगळग्रहापर्यंत मजल मारणारा भारत हा पहिला देश आहे. मंगळावर पोहोचण्यासाठी अमेरिकेला ५,सेवियत संघाला ८ प्रयत्न करावे लागले.

इस्त्रोचे दोन प्रमुख रॉकेटची नावे PSLV आणि GSLV आहेत. या रॉकेटद्वारेच उपग्रह अवकाशात सोडले जातात.

भारताची पृथ्वीपल्याडची पहिली मोहिम ही चांद्रयान १ होती. एक चांद्रयान ज्याने चंद्राच्या कक्षेत ८ नोव्हेंबर २००८ मध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT