Needly SOS mobile app for women-child safety esakal
विज्ञान-तंत्र

Needly SOS App : महिला- बाल सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक 'Needly SOS' मोबाईल ॲप; असे आहेत फीचर

How To Use Needly SOS App | महिला व बाल सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या अत्याधुनिक असे ''निडली एसओएस'' हे मोबाईल ॲप्लिकेशन अहमदनगरच्या श्री साई टेक्नो सर्व्हिसेस आणि पुणे येथील अभिनव आय.टी सोल्युशन्स यांनी तयार केले आहे.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Needly SOS Mobile App : अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महिला व बाल सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या ''निडली एसओएस'' या मोबाईल ॲपचा प्रारंभ जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक अशा ॲपचा चांगला वापर होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात ॲप प्रारंभ प्रसंगी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे, गौरी सावंत, सायली सोळंके, साई टेक्नो सर्व्हिसेसचे अजित रोकडे, तुषार वानखेडे, स्मिता तळेकर आदी उपस्थित होते.

महिला व बाल सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त असलेल्या अत्याधुनिक असे ''निडली एसओएस'' हे मोबाईल ॲप्लिकेशन अहमदनगरच्या श्री साई टेक्नो सर्व्हिसेस आणि पुणे येथील अभिनव आय.टी सोल्युशन्स यांनी तयार केले आहे.

अत्यंत कमी शुल्कामध्ये महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी अनेक सुविधा या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ''निडली एसओएस'' हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यास संकटकाळी महिलांना जवळच्या चार आप्तेष्टांना त्यांच्या मोबाईलवर संदेश व त्यांचे लोकेशन पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

ॲपमध्ये देण्यात आलेल्या सायरन बटन दाबल्यास मोठा सायरन सुरू होतो. आप्तेष्टांना संकटग्रस्त महिलेपर्यंत पोहोचता येते. ॲपमध्ये राज्यातील पोलिस ठाण्याचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. याचा उपयोग पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी करता येऊ शकतो. यासह इतरही सुविधा या ॲपमध्ये देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT