Netflix Down: व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स डाउन झाले आहे. नेटफ्लिक्स डाऊन झाल्यामुळे अमेरिकेतील हजारो यूजर्स नाराज आहेत. नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना मोबाइल अॅप तसेच साइटवर समस्या येत आहेत.
ट्विटरवरही युजर्स तक्रारी करत आहेत. #NetflixDown ट्विटरवर ट्रेंड करत आहे. शेकडो वापरकर्त्यांना व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करण्यात अडचणी येत आहेत. डाउन डिटेक्टरनेही नेटफ्लिक्स डाउन असल्याची पुष्टी केली आहे.
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउन डिटेक्टरनुसार रविवारी रात्री उशिरा अमेरिकेतील 11,000 हून अधिक वापरकर्त्यांसाठी Netflix सेवा बंद होती. (Netflix down for over 11,000 users; Services in US UK and India affected)
सुमारे दोन तास Netflix सेवा बंद :
डाऊन डिटेक्टरनुसार, सकाळी 5 वाजता हा गोंधळ लक्षात आला आणि 6.49 वाजता संपला. आउटेजमुळे 'लव्ह इज ब्लाइंड: द लाइव्ह रीयुनियन' शोच्या प्रसारणास उशीर झाला. व्हेनेसा आणि निक लॅची होस्ट करणार असलेला हा शो लॉस एंजेलिसमधून प्रसारित केला जाणार होता.
या शोचे प्रसारण सुरू झाले. परंतु अनेक वापरकर्त्यांनी सुमारे 45 मिनिटांनंतरही नेटफ्लिक्समध्ये प्रवेश करू शकत नसल्याची तक्रार केली.
नेटफ्लिक्सने माफी मागितली :
नेटफ्लिक्सने ट्विट करून युजर्सची माफी मागितली आहे. सकाळी 6:59 वाजता, Netflix ने ट्विट करत सांगितले की, "उशीरा उठलेल्या, लवकर उठलेल्या, आमच्या रविवारची दुपार चुकलेल्या प्रत्येकासाठी... ''लव्ह ब्लाइंड लाइव्ह रीयुनियन'' हे आमच्या नियोजित प्रमाणे घडले नाही.
याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही आता त्याचे चित्रीकरण करत आहोत आणि आम्ही ते शक्य तितक्या लवकर नेटफ्लिक्सवर प्रकाशित करू"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.