बर्याच लोकांना नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचे असते परंतु बजेटमध्ये मिळणारे प्लॅन्स उपलब्ध नसल्यामुळे बरेच वापरकर्ते एकमेकांचा प्लॅन शेअर करतात. अलीकडेच अशी बातमी आली होती की नेटफ्लिक्स हे फीचर बंद करण्याचा विचार करत आहे. भारतात Netflix चे सबस्क्रिप्शन 149 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत येत असले तरी कंपनी नवीन प्लॅन लॉंच करणार आहे.
त्यामुळे लवकरच नेटफ्लिक्स आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या प्लॅन्सची भेट देऊ शकते. कंपनीचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नवीन अँड-सपोर्ट प्लॅनवर काम करत आहे, जे कंपनीच्या सध्याच्या प्लॅनपेक्षा कमी किमतीत येतील.
आतापर्यंत, नेटफ्लिक्स आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवत नाही, परंतु वापरकर्त्यांना स्वस्त योजना देण्यासाठी कंपनी त्यावर काम करत आहे. कंपनीच्या कंपनीच्या सीईओंनी याप्रकरणी माहिती दिली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
कंपनीची योजना काय आहे?
रीड हेस्टिंग्स यांनी सांगितले की जे नेटफ्लिक्स वापरतात त्यांना माहित आहे की आम्ही जाहिरातींच्या गुंतागुंतीचा विरोध करतो आणि सबस्क्रिप्शनच्या साधेपणाचे समर्थन करतो. "परंतु मी या गोष्टीचा जितका चाहता आहे तितकाच मी कंज्युमर चॉईसचा देखील चाहता आहे आणि जे लोक कमी किंमतीत जाहिराती सहन करु शकतात त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे," त्यांनी असे एका प्री-रेकॉर्ड केलेल्या कॉन्फरन्समध्ये सांगितले.
याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, कंपनी आगामी काळात परवडणारे प्लॅन लॉन्च करू शकते. या प्लॅनमध्ये सदस्यांना जाहिराती देखील पाहायला मिळतील. डिस्ने प्लस हॉटस्टार देखील असे प्लॅन्स ऑफर करते. सध्या कंपनी सध्या भारतात परवडणाऱ्या किमतीत सबस्क्रिप्शन देत आहे.
सध्या किंमती काय आहेत?
नेटफ्लिक्स मोबाईल प्लॅन भारतात 149 रुपयांपासून सुरु होतात, आधी हा प्लॅन 199 रुपयांचा होता, कंपनीने काही दिवसांपू्र्वी या किंमती कमी केल्या आहेत. मात्र यामध्ये सब्सक्रिप्शन यूजर्स फोन किंवा टॅबलेटमध्ये 480p रेझोल्यूशन मध्येच व्हिडिओ पाहू शकतात. दरम्यान नेटफ्लिक्सचा बेसिक प्लॅन 199 रुपयांना येतो. आणि यामध्ये तुम्ही मोबाईल, टॅबलेट, कंप्युटर किंवा टिव्ही स्क्रीन वर नेटफ्लिक्स पाहू शकता. तर Netflix च्या स्टँडर्ड प्लानची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये, वापरकर्ते एकाच वेळी दोन भिन्न डिव्हायसेसव व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वापरू शकतात.
कंपनीचा स्टँडर्ड प्लॅन आधी 649 रुपये किंमतीचा होता. प्रीमियम प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास तो 649 मध्ये येतो, जो आधी 799 रुपयांमध्ये येत असे. या प्लॅनमध्ये यूजर्स 4K + HDR रिझोल्युशनवर व्हिडिओ पाहू शकतात. या प्लॅनमध्ये यूजर्स चार वेगवेगळ्या डिव्हाईसवर Netflix वापरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.