Netflix's New Strategy Free Streaming with Ads esakal
विज्ञान-तंत्र

Netflix Update : लवकरच नेटफ्लिक्स होणार सब्स्क्रिप्शन फ्री; कंपनी ठेवणार फक्त एकच अट,जाणून घ्या

Free OTT : नेटफ्लिक्स भारतासह जगभरात कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे.

Saisimran Ghashi

Netflix : नेटफ्लिक्स भारतासह जगभरात कोट्यवधी लोकांच्या पसंतीस उतरलेले आहे. आता नेटफ्लिक्स भारतात मोफत मनोरंजनाचा पर्याय आणणार का? असा सवाल सध्या सगळ्यांच्या मनात आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, परदेशात नेटफ्लिक्स मोफत अॅड-सपोर्टेड प्लॅन आणण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे.

भारतात अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म मोफत मनोरंजन देतात पण त्याबदल्यात जाहिराती पाहाव्या लागतात. नेटफ्लिक्स मात्र आतापर्यंत फक्त सब्सक्रिप्शनवरच चालत आला आहे. पण वाढती स्पर्धा आणि सब्सक्रायबर्सच्या वाढीमध्ये थोडी स्थिरता लक्षात घेऊन आता ते ही फ्री अॅड-सपोर्टेड प्लॅन आणण्याचा विचार करत आहेत.

याचा भारतात फायदा होऊ शकतो कारण इथे नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन plans आधीपासूनच अगदी कमी दरात उपलब्ध आहेत. बेसिक मोबाइल प्लॅन फक्त ₹१४९ इतका स्वस्त आहे. पण मोफत पर्याय आल्यास नेटफ्लिक्सवर अधिकाधिक प्रेक्षक येऊ शकतात. याचा फायदा म्हणजे जाहिरातींच्या माध्यमातून नेटफ्लिक्सलाही अतिरिक्त उत्पन्न मिळेल.

अजून याबाबतची कोणतीही घोषणा झालेली नसली तरी, भारतामध्ये netflixची लोकप्रियता पाहता नेटफ्लिक्स जर भारतात मोफत अॅड-सपोर्टेड प्लॅन आणला तर मात्र तो इथल्या प्रेक्षकांसाठी खूप आकर्षक ठरेल यात शंका नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मालाडमध्ये भाजपाचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT