Kepler-385 New Solar System eSakal
विज्ञान-तंत्र

Kepler-385 : अंतराळात नव्या सूर्यमालेचा शोध, केप्लर दुर्बिणीद्वारे मिळाली माहिती; सात ग्रहांचा आकार पृथ्वीपेक्षा मोठा

सकाळ डिजिटल टीम

पृथ्वीप्रमाणेच अंतराळात अन्य एखाद्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का, याचा शोध शास्त्रज्ञ कित्येक शतकांपासून घेत आहेत. या संशोधनाला बळ देणारे निरीक्षण ‘नासा’च्या निवृत्त केप्लर या अवकाश दुर्बिणीद्वारे मिळालेल्या माहितीचा अभ्यास करताना शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. या अभ्यासात सात ग्रहांच्या एका नव्या सूर्यमालेचा शोध लागला आहे.

या सूर्यमालेचे नामकरण ‘केप्लर-३८५’ असे केले आहे. आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहापेक्षा तेथील प्रत्येक ग्रहाला त्याच्या मूळ ताऱ्यापासून प्रखर उष्णता मिळते. या सौरमंडळातील सातही ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे पण नेपच्यूनपेक्षा लहान आहेत. काही ज्ञात सूर्यमालेत ज्याप्रमाणे सहापेक्षा अधिक सत्यापित ग्रह किंवा लघुग्रह आहेत, त्याचप्रमाणे ‘केप्लर-३८५’ची रचना आहे. केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत चार हजार ४०० लघुग्रह शोधले आहेत. यामध्ये ७०० पेक्षा जास्त बहुग्रहमाला आहेत.

‘‘केप्लर लघुग्रहांची आणि त्यांच्या गुणधर्मांची आतापर्यंतची सर्वांत अचूक यादी तयार केली आहे,’’ असे ‘नासा’च्या ॲमिज रिसर्च सेंटरमधील संशोधक शास्त्रज्ञ आणि नव्या यादीसंदर्भातील अहवालाचे प्रमुख लेखक जॅक लिसॉर यांनी सांगितले. सौर मंडळाच्या बाहेर ताऱ्याभोवती फिरणाऱ्या अनेक ज्ञात ग्रहांपैकी बहुतेकांचा शोध ‘नासा’च्या केप्लर मोहिमेने लावला आहे. या नव्या यादीमुळे खगोलशास्त्रज्ञांना अशा ग्रहांच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती मिळू शकेल, असेही ते म्हणाले. (Science News)

‘केप्लर-३८५’ची रचना व वैशिष्ट्ये

  • या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी सूर्यासारखा तारा आहे.

  • हा तारा आपल्या सूर्यापेक्षा दहा टक्क्याने मोठा आणि पाच टक्क्याने जास्त प्रखर आहे.

  • या ताऱ्यानजीकचे दोन ग्रह पृथ्वीपेक्षा किंचित मोठे असून खडकाळ असण्याची शक्यता आहे. तेथे विरळ वातावरण असू शकते.

  • इतर पाच ग्रहदेखील पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.

  • पाचही ग्रहांची त्रिज्या पृथ्वीच्या आकाराच्या दुप्पट असून तेथे दाट वातावरणात असणे अपेक्षित आहे.

‘केप्लर’ दुर्बिणीबाबत

  • अंतराळातील नव्या ग्रहमालांचा शोध व त्यांची तपशीलवार माहिती घेणे हे उद्दिष्ट.

  • केप्लरचे प्राथमिक निरीक्षण २०१३ मध्ये पूर्ण.

  • त्यानंतर दुर्बिणीच्या ‘के२’ मोहिमेला मुदतवाढ देण्यात आली.

  • ही मोहीम २०१८ पर्यंत सुरू होती.

  • केप्लरने गोळा केलेल्या माहितीतून आजही नव्या रहस्यांचा उलगडा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavish Aggarwal: ओलाला आणखी एक झटका! ग्राहकांकडून घेतलेले पैसे बँक खात्यात परत करावे लागणार, CCPAने दिले आदेश

MPSC Exam : लागा तयारीला, विविध पद भरतीसाठी परीक्षेची घोषणा! एमपीएससीतर्फे सूचना जारी; अर्ज करण्यासाठी या तारखेपर्यंत मुदत

Baba Siddique Murder: सिद्दिकींची हत्या कॉन्ट्रॅक्ट किलिंगच, पोलिसांना फ्री हॅन्ड द्या; भुजबळांची मागणी, जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीही

Pune Crime: पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने केला लैंगिक अत्याचार!

Box Office Collection: 'फुलवंती' की 'येक नंबर', चार दिवसात कुणी किती केलीये कमाई? वाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन

SCROLL FOR NEXT