Bing Search esakal
विज्ञान-तंत्र

Bing Search : AI मध्ये सुद्धा जोरदार स्पर्धा, ChatGPT चे दिवसही संपणार की काय?

हे यूजर्सच्या प्रश्नांना समजून घेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत देते

सकाळ ऑनलाईन टीम

Bing Search : गूगलला टक्कर देणारं चॅट जीपीटी अशी संपूर्ण जगामध्ये चॅट जीपीटीची चर्चा चालली होती. मात्र आता ChatGPT ची स्पर्धा वाढत असल्याचं दिसून येतंय. आता मायक्रोसॉफ्टने आपला नवीन बिंग सर्च सादर केला आहे. तांत्रिक भाषेत, हा नवीन Bing ब्राउझर ChatGPT इंटीग्रेशन आणतो. सोबतच हे यूजर्सच्या प्रश्नांना समजून घेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं सोप्या भाषेत देतं.

नवीन Bing आता सर्व Bing वापरकर्त्यांसाठी सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. यामध्ये एज, बिंग अॅप, वेब आणि बरेच काही समाविष्ट आहे. या सेवेअंतर्गत आणखी फीचर्स लवकरच सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

आम्हाला कळू द्या की मायक्रोसॉफ्टने वापरकर्त्यांसाठी एक नवीन वेटलिस्ट प्रोग्राम तयार केला आहे. हा प्रोग्राम अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना Bing शोध इंजिनच्या नवीन AI आधारित फिचर्समध्ये लवकर अॅक्सेस हवा आहे. जर तुम्हाला लवकर अॅक्सेस हवा असेल तर तुम्हाला साइन-अप देखील करावे लागेल. हे कसे करायचे ते आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.

नव्या बिंगवर असे करा साइन अप

सर्वप्रथम तुमच्या PC किंवा स्मार्टफोनच्या ब्राउझरवर जा आणि www.bing.com उघडा. त्यानंतर तुम्हाला एक पेज दिसेल ज्यामध्ये डायलॉग बॉक्स असेल. अपडेट केलेल्या बिंगमध्ये कोणते फिचर्स दिल्या गेलेय हे येथे तुम्हाला सांगितले जाईल.

त्यानंतर या ऑप्शन्सवर क्लिक करा

त्यानंतर तुम्हाला Learn More बटणावर टॅप करावे लागेल. हे तुम्हाला नव्या पेजवर घेऊन येईल. जेथे बिंगच्या नव्या फिचरला सपोर्टेड फिचरची माहिती देईल. त्यानंतर तुम्हाला join the waitlist ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. (Chat GPT)

त्यानंतर वेटलिस्टमध्ये रजिस्टर करा

जर तुम्ही आधीच Microsoft अकाउंटमध्ये लॉग इन केले असेल तर तुम्हाला एक मेसेज दिसेल की Great! You are on the waitlist. नसल्यास, तुम्हाला तुमच्या Microsoft अकाउंटमध्ये लॉग इन करण्यास सांगितले जाईल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला हा संदेश दिसेल. (Technology)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT