Google Maps Features esakal
विज्ञान-तंत्र

Google Maps Features : 'गुगल मॅप'मध्ये आलं नवं फीचर; आता घरबसल्या घ्या सुट्ट्यांचा आनंद

Google सह इतर कंपन्या त्यांच्या युजर्सना नवा अनुभव देण्यासाठी वेळोवेळी अॅपमध्ये बदल करत असतात.

सकाळ डिजिटल टीम

कंपनीनं हे फीचर यूजर्ससाठी रोल आउट करायला सुरुवात केली आहे, म्हणजे अजून हे फीचर सगळ्याच युजर्सना वापरायला मिळालेलं नाही. पण, हे फीचर हळूहळू सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल, असं कंपनीनं म्हटलंय.

Google सह इतर कंपन्या त्यांच्या युजर्सना नवा अनुभव देण्यासाठी वेळोवेळी अॅपमध्ये बदल करत असतात, नवनवे फीचर्स आणत असतात. नेव्हिगेशन आणि इतर फीचर्स देणार्‍या गुगल मॅप्समध्ये (Google Map) गुगलनं गुगल इमर्सिव्ह फीचर ॲड केलंय.

कंपनीनं हे फीचर यूजर्ससाठी रोल आउट करायला सुरुवात केली आहे, म्हणजे अजून हे फीचर सगळ्याच युजर्सना वापरायला मिळालेलं नाही. पण, हे फीचर हळूहळू सर्व यूजर्ससाठी उपलब्ध होईल, असं कंपनीनं म्हटलंय. पण, हे फीचर आहे तरी काय? आपल्यासाठी ते उपयोगाचं तरी आहे का? चला जाणून घेऊ..

गुगल इमर्सिव्ह फीचर काय आहे?

गुगल मॅपच्या या फीचरमुळं (Google Immersive Feature) तुम्हाला कुठेही न जाता त्या ठिकाणाचा अनुभव घेण्याची सुविधा मिळेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, या फीचरच्या मदतीनं तुम्ही अगदी कोणतही ठिकाण एक्सप्लोर करू शकतात. फेब्रुवारी 2023 मध्ये Google नं लॉस एंजेलिस, लंडन, सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क आणि टोकियोसह 5 शहरांमध्ये इमर्सिव व्ह्यू फीचर द्यायला सुरुवात केली होती.

Google इमर्सिव्ह व्ह्यूमध्ये तुम्ही स्ट्रीट व्ह्यू आणि एरियल इमेज पाहू शकता. यामुळं तुम्ही जगातील रियल टाइम लोकेशन रियलिस्टिक डिजिटल प्रमाणं बघू शकता. जर हे फीचर तुम्हाला हव्या असलेल्या लोकेशनसाठी उपलब्ध असेल, तर त्याचे फोटो तुम्हाला गॅलरीत दिसतील.

पण, यातून तुमचा डेटा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, त्यामुळं तुमचा फोन वायफायला कनेक्ट असल्याची खात्री करून मगच हे फीचर वापरा. Reddit वरील एका पोस्टमध्ये असं दिसून आलं होतं की, एकानं हे फीचर 30 मिनिटांसाठी वापरल्यावर त्याचा 2GB डेटा वापरला गेला. त्यामुळे हे फीचर तुम्हाला वायफायवरच पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT