New Mahindra Scorpio Classic : महिंद्राने आपली नवीन स्कॉर्पिओ क्लासिक सादर केली आहे. ही S आणि S11 या दोन व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आली आहे . त्याच्या किमतींबद्दल योग्य माहितीसाठी वाट पाहावी लागणार आहे. ही कार एक नवीन मॉडेल म्हणून आणण्यात आली असून ती नवीन स्कॉर्पिओ-एन सोबत विकली जाईल.
लुक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत याला अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. क्लासिकच्या पुढच्या फॅशियाला नवीन ग्रिल, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, सहा व्हर्टिकल क्रोम स्लॅट्स आणि ट्विन पीक्स लोगो मिळतात. लाईटसाठी त्यात फॉग लाइट्सच्या वर स्थित एलईडी डीआरएल आणि व्हर्टीकली स्टॅक केलेले एलईडी टेल लाइट दिले आहेत. तसेच एक नवीन फ्रंट बंपर, 17-इंच डायमंड-कट अलॉय व्हील आणि ड्युअल-टोन क्लेडिंग मिळते. तसेच स्कॉर्पिओ क्लासिक पाच रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे - पर्ल व्हाइट, नेपोली ब्लॅक, रेड रे, डीसॅट सिल्व्हर आणि गॅलेक्सी ग्रे,
इंजिन पॉवर
स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन रीअर-व्हील ड्राइव्हसह मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. तसेच, पॉवरट्रेनसाठी, ते 3,750rpm वर 130bhp पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. ट्रान्समिशन म्हणून, इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
फीचर्स
नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची केबिन अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह देण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला फोन मिररिंग, 16GB इंटरनल स्टोरेज, ड्युअल टोन ब्लॅक आणि बेज थीमसह नऊ इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय वुड ट्रिम्स, फ्रंट आणि रिअर आर्म-रेस्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल या सुविधाही देण्यात आल्या आहेत. इंजिनला स्टार्ट-स्टॉप बटण आणि मॉडेलसह स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल देखील मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.