Mercedes-Benz EQS 580 
विज्ञान-तंत्र

पुण्यात लॉंच झाली मर्सिडीझची पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रीक कार; देते 857 KM रेंज

सकाळ डिजिटल टीम

Mercedes-Benz EQS 580 Launched : मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतात त्यांनी EQS 580 इलेक्ट्रिक कार लाँच केले आहे, या कारची किंमत 1.55 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असून ही इलेक्ट्रिक लक्झरी सेडान भारतातील पुण्याजवळील चाकण येथील ब्रँडच्या उत्पादन प्रकल्पात स्थानिकरित्या असेंबल केली जाते. EQC आणि EQS 53 AMG नंतर इलेक्ट्रिक सब-ब्रँड EQ मध्ये लॉन्च होणारे हे तिसरे मॉडेल आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील पहिली मेड इन इंडिया मर्सिडीज-बेंझ लक्झरी इलेक्ट्रिक कार (580 4Matic) कंपनीच्या पुणे, महाराष्ट्रातील चाकण प्लांटमध्ये लॉन्च केली. त्यांच्या ट्विटर हॅँडलवरून या कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

इंजिन आणि स्पीड

मर्सिडीज-बेंझ EQS 580 मध्ये 107.8kWh बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. हे दोन इलेक्ट्रिक मोटर्सला सपोर्ट देते, जे पुढील आणि मागील एक्सलवर माउंट केले जातात. त्यांचे एकत्रित पॉवर आउटपुट 523 bhp आणि 855 Nm टॉर्क आहे. जरी परफॉर्मंस रेट EQS 53 AMG पेक्षा कमी असला तरी कार फक्त 4.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे.

ड्रायव्हिंग रेंज

कारची सिस्टीम 200kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, मर्सिडीजचा दावा आहे की 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही कार 300 किमीची रेंज देते. कंपनीचा दावा आहे की मर्सिडीज-बेंझ EQS 580 कार एका चार्जवर ARAI-प्रमाणित 857 किमीची रेंज देते.

लुक आणि डिझाइन

कारच्या लुक आणि डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास मर्सिडीज-बेंझ EQS 580 कारला एक टोन्ड-डाउन लुक देण्यात आला आहे आणि EQS 53 AMG च्या तुलनेत थोडीलहान आहे. EQS 53 AMG ची लांबी 5,223 मिमी आहे, तर EQS 580 ची लांबी 5,216 मिमी आहे. AMG ला उभ्या स्टाईल मिळतात, EQS 580 च्या फ्रंट ग्रिलवर मिनिएचर स्टार दिले आहेत जे चमकतात. AMG आवृत्तीचे आक्रमक फ्रंट आणि रिअर बंपर वेगळे करत दोन वेगवेगळे बंपर दिले आहेत. हे 5-स्पोक 20-इंच अलॉय व्हील आणि पाच एक्सटिरीयर कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

कारमध्ये खास काय आहे

इंटेरियर आणि फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास मर्सिडीज-बेंझ EQS 4MATIC ही MBUX हायपरस्क्रीनसह येते ज्यामध्ये तीन मोठे हाय-डेफिनिशन डिस्प्ले आहेत. कंपनीने यामध्ये अनेक इंटीरियर कलर ऑप्शन्स दिले आहेत. त्यात बालाओ ब्राउनसह नेवा ग्रे, स्पेस ग्रेसह मॅकियाटो बेज आणि तपकिरी ओपन-पोर वॉलनट वुड सारख्या रंगांचा समावेश आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत, यात हेड-अप डिस्प्ले, पुढच्या सीटसाठी मसाज फंक्शन, बर्मेस्टर 3D सराउंड सिस्टम, एअर फिल्टरेशन सिस्टम, 9 एअरबॅग्ज आणि बरेच काही देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT