Car Safety  esakal
विज्ञान-तंत्र

Car Safety : तुमची कार किती सुरक्षित? देशभरात लवकरच सुरू होईल टेस्टिंग अन् त्यानुसार असेल सेफ्टी स्टार रेटिंग

देशातील कारची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल ठरेल

साक्षी राऊत

Car Safety : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मंगळवारी भारत NCAPचे लाँचिंग झाले. देशातील कारची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल ठरेल. देशात दरवर्षी एक लाखाहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अशा परिस्थितीत या निर्णायाचा सुरक्षेच्या दृष्टीने सगळ्यांनाच मोठा फायदा होणार आहे.

आता आपल्याच देशात कारची क्रॅश टेस्टिंग करून त्यानुसार सेफ्टी स्टार रेटिंग देणे शक्य होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी भारत NCAP (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) आणि AIS-197 अंतर्गत गाड्यांसाठी स्टार रेटिंगची सुरुवात केली आहे. 1 ऑक्टोबरपासून कार उत्पादकांना या प्रणालीअंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या कारला स्टार रेटिंग मिळेल. यामध्ये 5 स्टार ते सिंगल स्टार रेटिंगचा समावेश असेल.

सेफ्टी स्टँडर्डची पूर्तता करणाऱ्या कारला त्यानुसार स्टार रेटिंग देण्यात येईल. स्टार रेटिंगमुळे गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता असून कारच्या किंमती किती पटीने वाढेल हे इत्यकात कळू शकणार नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सध्या कार उत्पादक कंपन्यांसाठी सेफ्टी स्टार रेटिंग अनिवार्य नाही. हा पर्याय सध्या इच्छुकांसाठी असणार आहे. ते स्वेच्छेने त्यांच्या कारचे सेफ्टी ऑडिट करून घेऊ शकतात. यापूर्वी ही ऑडिट परदेशात करण्यात आली होती. देशात दररोज 1000 हून अधिक रस्ते अपघातांमध्ये 400 लोकांचा मृत्यू होतो. कारचे स्टार रेटिंग ही स्थिती सुधारण्यास मदत करेल.

ग्लोबल स्टँडर्डला टक्कर देणार भारतातील NCAP

इंडिया NCAP कोणत्याही टप्प्यावर ग्लोबल NCAP पेक्षा कमी नसणार. भारतीय रस्ते, ड्रायव्हिंग पॅटर्न आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. सध्या, कार उत्पादकांसाठी ही चाचणी घेणे ऐच्छिक आहे.

बहुतेक देशांत रस्त्यांवरील अपघातांमध्ये हे़डऑन अपघाताचे प्रमाण जास्त आहे. पण भारतातील वाहतूक व्यवस्था अगदी वेगळी आहे. येथे लोक लेनवरून वाहन चालवताना निष्काळजीपणा करतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन, भारतात करावयाच्या क्रॅश टेस्टिंगसाठी हेड-ऑन, साइड क्रॅश आणि इतर प्रकारचे रस्ते अपघात लक्षात घेऊन या चाचण्या केल्या जातील.

यामध्ये, समोरासमोर, साइड आणि पोल साइड इफेक्ट तपासण्यासाठी चाचण्या तीन, चार आणि पाच स्टार रेटिंगमध्ये अनिवार्यपणे केल्या जातील. गाड्यांवर स्टार रेटिंग स्टिकर्स लावले जातील. जेणेकरून ग्राहकांना कार खरेदी करताना स्टार रेटिंगची बघून घेणे सोयीस्कर ठरेल. एक्सपर्ट पीयूष तिवारी म्हणतात की, भारतातील एनसीएपी कोणत्याही स्तरावर ग्लोबल एनसीएपीपेक्षा कमी असणार नाही. स्टँडर्ड बनवताना गाड्यांच्या क्रॅश टेस्टमध्ये सर्व चाचण्या झाल्या पाहिजेत याची काळजी घेण्यात आली आहे.

रेटिंग स्टँडर्ड कसे असतील?

अधिका-यांनी सांगितले की ज्या कारला 5 स्टार रेटिंग दिले जाईल, त्या कारसाठी 68 प्रकारच्या क्रॅश टेस्ट केल्या जातील. यामध्ये प्रौढांसाठी 27 आणि लहान मुलांसाठी 41 प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. या सर्व चाचण्या उत्तीर्ण होणाऱ्या गाड्यांनाच 5 स्टार रेटिंग दिले जाईल. जर त्यात काही कमतरता असेल तर त्यानुसार त्याचे रेटिंग कमी केले जाईल. प्रौढ आणि मुलांसाठी 22 आणि 35 प्रकारच्या चाचण्या फोर स्टार रेटिंगमध्ये, 3 स्टार रेटिंगमध्ये 16 आणि 27, डबल स्टार रेटिंगमध्ये 10 आणि 18 आणि प्रौढांसाठी सिंगल स्टार रेटिंगमध्ये चार प्रकारच्या आणि लहान मुलांसाठी नऊ प्रकारच्या चाचण्या केल्या जातील. (Automobile)

टेस्टिंगने कमी होतील का रस्त्यावरचे अपघात?

गेल्या वर्षी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री आणि त्यांच्या मित्राचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते अपघातांबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते अपघात रोखणे हा सेफ्टी स्टार रेटिंगचा उद्देश आहे. असा दावा केला जात आहे की नवीन सुरक्षा नियमांमध्ये केवळ समोर-मागील क्रॅश चाचण्यांचा समावेश नाही तर कारच्या दोन्ही बाजूंच्या क्रॅश चाचण्यांचा देखील समावेश असेल, परंतु त्याचे निरीक्षण कसे केले जाईल हा मोठा प्रश्न असेल. (car Safety Rating)

यासोबतच अपघात टाळण्यासाठी रस्तेही सुरक्षित करावे लागतील. चालकांचे ड्रायव्हिंग सेन्स सुधारण्याचे प्रयत्नही सुरू ठेवावे लागतील. तरच आपण संपूर्ण जगात सर्वाधिक अपघात झालेल्या देशांच्या यादीतून बाहेर पडू शकू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT