Nitin Gadkari Toyota Camry eSakal
विज्ञान-तंत्र

Nitin Gadkari Toyota Camry : गडकरींनी उल्लेख केलेली टोयोटाची गाडी का आहे खास? फ्लेक्स-फ्युएलचा काय होणार फायदा?

Toyota Kirloskar Cars : टोयोटा-किर्लोस्कर कंपनी देशात एक फ्लेक्स-फ्युएल कार लाँच करणार आहे, असं गडकरींनी सांगितलं.

Sudesh

Nitin Gadkari News : पुण्यातील चांदणी चौकात नव्याने झालेल्या उड्डाणपुलाचं आज लोकार्पण करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पुण्यातील प्रदूषण कमी करण्याबाबत काही सल्ले राज्य सरकारला दिले. यात इथेनॉलचा वापर सुरू करण्याचं प्रमुख आवाहन त्यांनी केलं. आपल्याला देशातून पेट्रोल-डिझेल हद्दपार करायचं आहे अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी टोयोटाच्या फ्लेक्स-फ्युएल कारचा उल्लेख केला.

टोयोटा-किर्लोस्कर कंपनी देशात एक फ्लेक्स-फ्युएल कार लाँच करणार आहे, असं गडकरींनी सांगितलं. टोयोटा कॅमरी (Toyota Camry) असं या कारचं नाव असणार आहे. "या गाडीचं जुनं व्हर्जन हे 40 टक्के वीजेवर आणि 60 टक्के पेट्रोलवर चालायचं. मात्र, या महिन्यात मी याचं नवीन व्हर्जन लाँच करणार आहे, जे 100 टक्के इथेनॉलवर चालेल.", असं ते म्हणाले. (Nitin Gadkari)

इथेनॉलची किंमत आणि गाडीचं मायलेज लक्षात घेता, सुमारे 15 रुपये प्रतिलीटर इंधनावर ही कार धावू शकेल असा दावा गडकरींनी यावेळी केला. टोयोटा कॅमरी ही गाडी भारतात लाँच झाल्यानंतर त्याचे फीचर्स आणि किंमत याबाबत अधिक माहिती उपलब्ध होईल. सध्या या गाडीच्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत सुमारे 47 लाख रुपये आहे.

काय आहे फ्लेक्स फ्युएल?

पेट्रोल आणि डिझेल हे पृथ्वीच्या पोटातून बाहेर काढले जातात. तर फ्लेक्स फ्युएल हे लॅबमध्ये तयार करण्यात येतं. यासाठी पेट्रोलसोबत इथेनॉल किंवा मिथेनॉल मिक्स करण्यात येतं. इथेनॉल हे मका किंवा ऊसापासून तयार करता येतं. इथेनॉलच्या वापरामुळे प्रदूषण कमी होतं, तसेच इंधनाची किंमतही कमी होते.

टोयोटा मिराई

"हायड्रोजन इंधन हे भविष्य आहे. माझ्याजवळ असणारी 'टोयोटा मिराई' ही हायड्रोजनवर धावणारी गाडी आहे. मिराई या शब्दाचा अर्थच भविष्य होतो. पुण्याला भविष्यात पेट्रोल-डिझेल मुक्त केलं तर इथलं 40 टक्के प्रदूषण नाहीसं होईल", असं गडकरी म्हणाले.

मिराई कारमध्ये 5.2 लीटर क्षमतेचा हायड्रोजन टँक मिळतो. एकदा टँक फुल केल्यानंतर ही कार तब्बल 646 किलोमीटर धावू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात या कारची किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे. अद्याप ही गाडी भारतात लाँच करण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT