Google Maps Hotel Rating Fraud esakal
विज्ञान-तंत्र

Cyber Fraud : वर्क फ्रॉम होम करताना झाली एक चूक अन् लागला लाखोंचा गंडा,जाणून घ्या प्रकरण

Online Fraud : ग्रेटर नोएडाच्या रहिवासीसोबत घडलेल्या work from home घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Saisimran Ghashi

Cyber Crime : ग्रेटर नोएडाच्या रहिवासीसोबत घडलेल्या work from home घोटाळ्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या व्यक्तीची फसवणूक करून त्याच्याकडून तब्बल 20 लाख 54 हजार रुपये लुटण्यात आले आहेत. नोएडामध्ये राहणाऱ्या संदीप कुमार यांना गुगल मॅप्सवर हॉटेल्स रेटिंग करण्यासाठी मोबदला देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर क्राईम पोलीस स्टेशन, नोएडा सेक्टर 36 मध्ये अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी झाली फसवणूक?

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कुमार यांच्या व्हॉट्सएपवर एक मेसेज आला. त्यात त्यांना घरून काम करण्याची संधी देण्यात येत होती. या कामामध्ये त्यांना फक्त गुगल मॅप्सवर हॉटेल्सना रेटिंग द्यायची होती. यासाठी त्यांना मोबदलाही मिळणार होता.

कुमार यांनी या मेसेजला उत्तर दिल्यानंतर त्यांना टेलीग्राम ग्रुपमध्ये जोडण्यात आले. या ग्रुपमध्ये आधीपासूनच सुमारे १०० सदस्य होते. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला त्यांनी रेटिंगची कामे केली. मात्र, हळूहळू यात गुंतवणूक करण्याच्या सूचनाही येऊ लागल्या.

कुमार यांनी सांगितलं, "सुरुवातीला मी हॉटेल्सना रेटिंग देत होतो. यासोबतच काही गुंतवणूक करण्याच्या सूचनाही आल्या. त्यानुसार मी सुरुवातीला 50,000 रुपये गुंतवले. पण या वेबसाइटवरून मी पैसे काढू शकत नव्हतो." त्यानंतर जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना कर म्हणून आणखी 5 लाख रुपये भरण्याची सूचना देण्यात आली. या प्रकारे त्यांचेकडून एकूण 20,54,464 रुपये गुंतवून घेण्यात आले.

कुमार यांनी पुढे सांगितले, "त्यांनी मला त्यांच्या खात्यात कर म्हणून आणखी 5 लाख रुपये भरण्यास सांगितले. तेव्हाच मला मी आर्थिक फसवणूकीचा बळी ठरलो आहे हे लक्षात आले. आता माझ्या गुंतवलेल्या सुमारे 20 लाख 54 हजार रुपये मी काढू शकत नाही."

कुमार यांनी आरोप केला आहे की, त्यांना या फसवणूकर्त्यांकडून टेलीग्राम आणि फोन कॉल्सवरुन जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. ते म्हणाले, "या लोकांकडून मला टेलीग्रामवर आणि फोनवरूनही खाते डीफ्रीज करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी मिळत आहे."

अश्या सायबर क्राइम फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत.त्यामुळे आपण सतर्क राहणे आणि अश्या कोणत्याच ऑफर्सना बळी न पडता यात गुंतवणूक नाही केली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

SCROLL FOR NEXT