nokia c2 2nd edition nokia c21 nokia c21 plus and nokia wireless headphones 
विज्ञान-तंत्र

Nokia चे 3 स्वस्त स्मार्टफोन, 60 तास चालणारे वायरलेस हेडफोन लॉंच

सकाळ डिजिटल टीम

प्रसिध्द मोबाईल बनवणारी कंपनी नोकियाने रविवारी (27 फेब्रुवारी) आपले तीन स्मार्टफोन, Nokia C2 2nd Edition, Nokia C21 आणि Nokia C21 Plus स्मार्टफोन लॉन्च केले. कंपनीने तिन्ही फोन बजेट मॉडेल्स म्हणून डिझाइन केले आहेत, जे फीचर फोनवरून अपग्रेड करत असलेल्या ग्राहकांसाठी बेस्ट ठरु शकतात.

Nokia C21 Plus ड्युअल रियर कॅमेऱ्यासह येतो, तर Nokia C2 2 रे एडिशन आणि रेग्युलर Nokia C21 सिंगल रियर कॅमेरासह येतो. Nokia C2 2nd Edition मध्ये पारंपारिक डिस्प्ले डिझाइन देखील आहे, तर Nokia C21 आणि Nokia C21 Plus मध्ये वॉटरड्रॉप-स्टईल नॉच दिली आहे. कंपनीने सी-सीरीज स्मार्टफोनसोबत वायरलेस हेडफोन्सही सादर केले आहेत. त्यांच्या किंमती-फीचर्सवर एक नजर टाकूया...

Nokia C2 2nd Edition मध्ये काय खास आहे

ड्युअल-सिम (Nano) Nokia C2 2nd Edition Android 11 (Go Edition) वर चालतो आणि त्यात 5.7-इंचाचा FWVGA डिस्प्ले दिली आहे. फोन क्वाड-कोर मीडियाटेक प्रोसेसरने सुसज्ज आहे, 2GB पर्यंत RAM सह मिळते . फोनमध्ये फिक्स्ड फोकस लेन्स आणि एलईडी फ्लॅशसह 5-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 2-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर मिळतो. फोनमध्ये स्टँडर्ड 32GB स्टोरेज उपलब्ध आहे, जे मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 2400mAh ची काढता येणारी बॅटरी देखील आहे.

Nokia C21

ड्युअल-सिम (नॅनो) Nokia C21 Android 11 (Go Edition) वर चालतो आणि 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. फोनला 3GB पर्यंत RAM मिळते, जी ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसरसह जोडलेली आहे. फोनमध्ये फिक्स्ड फोकस लेन्स आणि एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा सेन्सर दिला आहे. समोर LED फ्लॅशसह 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील मिळतो. फोन 32GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. फोनमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील असून याशिवाय यात 3000mAh बॅटरी आहे.

Nokia C21 Plus मध्ये विशेष काय आहे

Nokia C21 प्रमाणेच ड्युअल-सिम (नॅनो) असलेला Nokia C21 Plus Android 11 (Go Edition) वर चालतो आणि यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये समान ऑक्टा-कोर Unisoc SC9863A चिप देखील आहे जी नियमित मॉडेलमध्ये असते. फोनला 4GB पर्यंत RAM मिळते. फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा प्रयमरी सेन्सर आणि मागील बाजूस LED फ्लॅशसह 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर पॅक केला आहे. समोर 5-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील आहे. यासोबत फोनमध्ये 4000mAh बॅटरी मिळते

नोकिया वायरलेस हेडफोन्स

नोकिया वायरलेस हेडफोन्स 40mm ड्रायव्हर्स आणि सॉफ्ट कुशन डिझाइनसह येतात. हेडफोन्समध्ये कस्टम फिटसाठी अॅडजस्टेबल आर्म देखील आहे आणि ते स्टोरेजसाठी फोल्ड फोल्डेबल डिझाइनमध्ये येतात. याव्यतिरिक्त, हेडफोन इनबिल्ट मायक्रोफोन वापरून हँड्स-फ्री कॉलिंगला सपोर्ट करतो आणि व्हॉइस असिस्टंट अलेक्सा, सिरी आणि Google असिस्टंटचा सपोर्ट देखील मिळतो. हेडफोन ब्लूटूथ v5.2 कनेक्टिव्हिटीसह येतात सोबत यामध्ये 800mAh बॅटरी मिळते जी एका चार्जवर 60 तासांपर्यंत प्लेबॅक टाईम देते. चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट देखील आहे. शिवाय, हेडफोन काळ्या आणि पांढर्‍या रंगात येतात आणि त्यांचे 188 ग्रॅम इतके आहे.

किंमती किती आहेत

Nokia C2 2 ऱ्या आवृत्तीची किंमत EUR 79 (अंदाजे रु. 6,700) पासून सुरू होते, तर Nokia C21 ची किंमत EUR 99 (अंदाजे रु. 8,400) पासून सुरू होते आणि Nokia C21 Plus ची किंमत EUR 119 (अंदाजे रु. 10,100) पासून सुरू होते. ृ Nokia C2 2nd Edition आणि Nokia C21 Plus एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. तर Nokia C21 मार्चच्या अखेरीस उपलब्ध होईल. दुसरीकडे, Nokia वायरलेस हेडफोन , US मध्ये $49.99 (अंदाजे रु. 3,800) च्या किंमतीत (RRP) विकत घेता येतील

Nokia C2 2nd एडिशन, Nokia C21, Nokia C21 Plus आणि Nokia वायरलेस हेडफोन्सची भारतातील किंमत आणि उपलब्धता अजून जाहीर केलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT