Guwahati Welcomes 'Iris', Northeast's First AI Teacher esakal
विज्ञान-तंत्र

AI Teacher : या AI शिक्षिकेने जिंकलं विद्यार्थ्यांचं मन ; निती आयोगाचा प्रकल्प आसाममध्ये लाँच

सकाळ डिजिटल टीम

Artificial Intelligence : शाळेमध्ये शिकत असताना सर,मॅडम आपल्याला शिकवतात. आपल्याशी संवाद साधतात.आपल्या चुकांचे निरसण करतात आणि वेळ पडल्यास आपल्याला रागावतात. पण विचार करा जर हीच सगळी कामे एक मशीन करायला लागली तर?हे सत्यात घडलं आहे आसाममध्ये.

भारताच्या ईशान्येकडील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षिका आता आसाममध्ये आली आहे. गुवाहाटीच्या एका खासगी शाळेत 'Iris' नावाच्या या रोबोट शिक्षिकेने विद्यार्थ्यांचं मन जिंकलं आहे.

परंपरागत 'मेखला सादर' आणि दागिन्यांमध्ये सजलेली 'Iris' विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तर देते. एवढंच नाही तर हेमोग्लोबिन म्हणजे काय? अशा शाळेच्या अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांवर देखील ती सविस्तर आणि उदाहरणासह उत्तर देते, असं शाळेच्या शिक्षिकेने सांगितलं.

हे रोबोट हात मिळवणे, हातवारे करून शिकणे आणखी मनोरंजक बनवते. त्यामुळे विद्यार्थी उत्सुकतेने तिच्याशी प्रश्नोत्तरे आणि विविध क्रियामध्ये सहभागी होत आहेत. 'Iris' कडे आवाज-नियंत्रित सहाय्यक आहे, जो विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास आणि सविस्तर स्पष्टीकरण देण्यास मदत करते.

"कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या शिक्षिकेकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे असल्याने मुले खूप उत्साहित आहेत," असे शाळेच्या शिक्षिकेने सांगितलं. NITI आयोगाच्या अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्पा अंतर्गत मेकरलॅब्ज एडु-टेकच्या सहकार्याने हा रोबोट तयार करण्यात आला आहे.'Iris' शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या विविध शिकण्याच्या शैलींना अनुकूल शिक्षण अनुभव देण्यासाठी 'AI Teacher' चा वापर हा एक महत्वाचा टप्पा आहे.

ईशान्येकडील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी या रोबोटच्या क्षमतेचा वापर करण्याचे नियोजन अधिक फायद्याचे ठरणार आहे. , असे शाळेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागली; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT