Nothing update Sakal
विज्ञान-तंत्र

Nothing Update: नथिंग फोन १ वापरताय? आले नवीन अपडेट, मिळणार 'हे' नवीन फीचर्स

नथिंग फोन १ वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी फोनसाठी नवीन ओएस अपडेट जारी करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nothing New OS Update: Nothing ने काही दिवसांपूर्वीच आपला पहिला वहिला स्मार्टफोन Phone 1 ला लाँच केले होते. हटके फीचर्स आणि कमी किंमतीमुळे या फोनला ग्राहकांची पसंती मिळाली होती. आता कंपनी फोनसाठी Nothing OS 1.1.7 अपडेट जारी केले आहे. नवीन अपडेटमुळे यूजर्सला अनेक फीचर्सचा फायदा मिळेल.

या अपडेटनंतर यूजर्सला AirPods चे बॅटरी परसेंटेज देखील फोनमध्ये दिसतील. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, लवकरच सर्व यूजर्ससाठी रोलआउट केले जाईल. नवीन अपडेटमुळे फोनमधील इतर त्रुटी देखील दूर होतील.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

नवीन अपडेटमुळे शानदार ऑप्टिमाइजेशन आणि परफॉर्मेंस मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. याशिवाय, व्हीडिओ रेकॉर्डिंगमध्ये ऑडिओ क्वालिटीत देखील सुधारणा पाहायला मिळेल. अपडेट आल्यानंतर बॅटरीबाबत अचूक माहिती स्क्रीनवर दिसेल. याआधी यूजर्सने बॅटरी इंडिकेटरबाबत तक्रार केली होती.

Nothing OS अपडेटमध्ये लॉक स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅप नॉटिफिकेशन बगला देखील दुरुस्त करण्यात आले आहे. फोन गरम होण्याची तक्रार देखील यामुळे दूर होईल. तुम्ही देखील Nothing Phone 1 वापरत असल्यास फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करू शकता.

Nothing चे सीईओ कार्ल पेई यांनी काही दिवसांपूर्वीच अँड्राइड १३ आधारित Nothing OS १.५.० बीटा अपडेटचे टीझर जारी केले आहे. परंतु, बीटा प्रोग्राम लाँचिंगबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. कंपनी नथिंग फोन १ साठी वर्ष २०२३ च्या सुरुवातीला अँड्राइड १३ चे स्टेबल अपडेट जारी करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील हवा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT