Nothing Phone 2a Plus Design Officially Revealed Ahead of India Launch esakal
विज्ञान-तंत्र

Nothing Phone 2a Plus: एक झलक सबसे अलग! आज लाँच होतोय नथिंगचा हा ब्रँड मोबाईल, फीचर्स अन् किंमत पण एकदम खास

Saisimran Ghashi

Nothing Phone 2a Plus Features : इंग्लंडमधील प्रसिद्ध डिझायनर कार्ल पे यांनी स्थापन केलेला नथिंग ब्रँड भारतात गाजत आहे. ३१ जुलैला नथिंगचा नवीन स्मार्टफोन नथिंग फोन (2a) प्लस लाँच होणार आहे. कंपनीने अधिकृत लाँचच्या अगदी एक दिवस आधीच या फोनची पहिली झलक दाखवली आहे.

नथिंगने शेअर केलेल्या टीजर इमेजमध्ये फोनच्या मागच्या बाजूचा पूर्ण देखावा पाहायला मिळतो. या फोनमध्ये दोन टोनचा रंग आणि ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम दिसत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, नथिंगने पुष्टी केली होती की फोन (2a) प्लस मध्ये दोन 50 मेगापिक्सल रियर कॅमेरे आणि एक 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असेल. याशिवाय, इंटरनेटवरवर नथिंग फोन (2a) प्लस आणि त्याच्या रिटेल बॉक्सच्या काही लीक झालेल्या इमेजेस समोर आल्या आहेत.

जुन्यापेक्षा वेगळं काय?

नथिंगने मंगळवारी त्यांच्या आगामी स्मार्टफोनची डिझाइन शेअर केली. या फोनमध्ये वेगळ्या पद्धतीच डिझाइन दिसत आहे. फोनच्या मागच्या बाजूला दोन रियर कॅमेरे आहेत. ही इमेज मे महिन्यात लाँच झालेल्या नथिंग फोन (2a) सारख्याच डिझाइनची असल्याचे दिसून येते. नवीन फोनमध्ये एलईडी लाइट्स आणि टेक्सचर्ड आउटलाइन असलेला ग्लिफ इंटरफेस देखील असल्याचे दिसते.

Nothing Phone 2a Plus

याशिवाय, स्मार्टप्रिक्स या वेबसाईटने नथिंग फोन (2a) प्लस आणि त्याच्या रिटेल बॉक्सच्या काही लीक झालेल्या इमेजेस शेअर केल्या आहेत. या रिटेल पॅकेजमध्ये बॉक्सी डिझाइन आहे आणि ते "प्लस" हा टेक्स्ट वगळता नथिंग फोन (2a) सारखेच दिसते.

काय आहे खास?

आधीच समोर आलेल्या माहितीनुसार, नथिंग फोन (2a) प्लस मध्ये मिडियाटेक डिमेन्सिटी 7350 प्रो चिपसेट असेल. यात 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 50 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. तसेच 12GB रॅम आणि रॅम बूस्टर टेक्नॉलॉजीसह आंतरिक मेमरी व्हर्च्युअली 20GB पर्यंत वाढवता येईल. यात माली-जी610 MC4 GPU असेल.

लीक झालेल्या माहितीनुसार, नथिंग फोन (2a) प्लस ब्लॅक आणि ग्रे या दोन रंगांमध्ये उपलब्ध होईल. यात 6.7-इंच 120Hz AMOLED स्क्रीन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. तसेच 50W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000mAh ची बॅटरी असण्याचीही अपेक्षा आहे.

नथिंग फोन (2a) प्लस ३१ जुलै लाँच होणार असून त्याच्या किंमती आणि इतर वैशिष्ट्यांची अधिकृत घोषणा याच दिवशी होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT