Nothing Phone 2a Plus Launch Date and Specs Leaked esakal
विज्ञान-तंत्र

Nothing Smartphone Launch : सेल्फी लवर्ससाठी आनंदाची बातमी! स्मार्टफोनच्या दुनियेत धमाका करणाऱ्या फोनची होणार दमदार एंट्री

Saisimran Ghashi

Nothing Phone 2a Plus : सेल्फी लवर्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. Nothing कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन Nothing Phone 2a Plus मार्केटमध्ये लॉंच आहे. या फोनमध्ये तुम्हाला एक जबरदस्त फ्रंट कॅमेरा पाहायला मिळणार आहे. हा नवीन स्मार्टफोन टेक्नॉलजीच्या दुनियेत धमाका करणार आहे यात शंका नाही.

काय आहे खास?

जबरदस्त सेल्फी कॅमेरा: या फोनमध्ये तुम्हाला 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. याचा अर्थ तुमच्या सेल्फी आणखीन स्पष्ट आणि तेजस्वी होतील.

दमदार प्रोसेसर: या फोनमध्ये MediaTek Dimensity 7350 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम दिले जाणार आहे. यामुळे तुमचा फोन अतिशय वेगवान आणि स्मूथ काम करेल.

मोठी बॅटरी: या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिलेली आहे. यामुळे तुम्हाला दिवसभर तुमचा फोन वापरण्यासाठी पुरेसा चार्ज मिळेल.

फास्ट चार्जिंग: या फोनमध्ये 50W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. यामुळे तुमचा फोन लवकर चार्ज होईल.

तसेच या फोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि NFC कनेक्टिव्हिटी सारखी वैशिष्ट्ये मिळतील.

कधी होईल लाँच?

Nothing Phone 2a Plus 31 जुलै रोजी लाँच होणार आहे. हा फोन तुम्हाला काळे आणि राखाडी या दोन रंगांमध्ये मिळेल.

या फोनबद्दल अधिक माहिती कंपनी लवकरच उपलब्ध करून देईल. तुम्ही Nothing कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा सोशल मीडियावर जाऊन या फोनबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

प्रत्येकाला सेल्फी घेण्याचा छंद असतो, तर हा फोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या फोनमध्ये दिलेला 50MP चा फ्रंट कॅमेरा तुमच्या सेल्फीला एक नवीन उंची देईल.

ड्युअल रियर कॅमेरा - या फोनमध्ये 50MP+50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. 6.7 इंचाचा डिस्प्ले- या फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम- फोन अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. Nothing Phone 2a Plus एक जबरदस्त स्मार्टफोन आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalna Accident: भीषण दुर्घटना! जालना-वडीगोद्री मार्गावर एसटी बस अन् ट्रकची टक्कर, ५ जणांचा मृत्यू

ही वाट्टेल तशी खेळते आणि... मीरा जग्गनाथने अंकितावर साधला निशाणा; पण नेटकऱ्यांनी घेतली तिचीच शाळा

ENG vs AUS 1st ODI : २५ चेंडूंत ११० धावा! Travis Head ला रोखणं झालंय अवघड; ख्रिस गेल स्टाईल सेलिब्रेशन

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; निफ्टी 25,500च्या वर, मिडकॅप निर्देशांक तेजीत

Assembly Election : राजू शेट्टी, संभाजीराजेंसमोर 'होमपीच'वरच आव्हान; उमेदवार ठरवताना तिसऱ्या आघाडीची लागणार कसोटी

SCROLL FOR NEXT