WhatsApp Latest Feature sakal
विज्ञान-तंत्र

आता WhatsAppवरून डाउनलोड करता येतील पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स

आता लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत.

सकाळ डिजिटल टीम

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह इतर कागदपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. डिजीलॉकर सेवेचा वापर करण्यासाठी लोक आता WhatsApp वरील MyGov हेल्पडेस्कमध्ये प्रवेश करू शकतील, मंत्रालयाने म्हटलं आहे.

लोकांचं डिजीलॉकर खाते तयार करून प्रमाणीकरण करणे, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे डाउनलोड करणे अशा सर्व सुविधा व्हॉट्सअॅपवर दिल्या जातील.

WhatsApp वर MyGov हेल्पडेस्कची सुविधा हे लोकांच्या सोयीच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. MyGov हेल्पडेस्क आता डिजीलॉकर सेवेद्वारे लोकांना घरबसल्या अनेक सुविधा पुरवणार आहे. आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे येथून त्वरित डाउनलोड करता येऊ शकतात. यासोबतच लोकांना अडचणीच्या वेळीही या सुविधेचा वापर करता येणार आहे. (Now many documents including PAN card, DL can be downloaded from WhatsApp)

या कागदपत्रांचा आहे समावेश- या अंतर्गत लोक पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीबीएसई इयत्ता दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी), दहावीची मार्कशीट, बारावीची मार्कशीट, विमा पॉलिसीची इत्यादी कागदपत्रे ठेवू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅपवरील डिजिलॉकर फिचरचे फायदे-

देशभरातील WhatsApp वापरकर्ते WhatsApp क्रमांक +91 9013151515 वर 'हॅलो किंवा हाय किंवा डिजिलॉकर' संदेश पाठवून चॅटबॉटचा वापर करू शकतात. यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट डाउनलोड करायचे आहे, ते डिजिलॉकरवरून डाउनलोड करता येऊ शकते. WhatsApp वर DigiLocker सारखे वैशिष्ट्य, MyGov चॅटबॉट हे नागरिकांना संसाधने आणि अत्यावश्यक सेवांमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने आहे.

80 दशलक्षाहून अधिक लोक जोडलेले आहेत

मार्च 2020 मध्ये कोविडच्या काळात, WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क (पूर्वी MyGov कोरोना हेल्पडेस्क म्हणून ओळखले जाणारे) लोकांना कोविडशी संबंधित माहिती देत ​​असे. यासोबतच लसीचे प्रमाणपत्र बुक करून डाउनलोड करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. आजपर्यंत, 80 दशलक्षाहून अधिक लोक हेल्पडेस्कवर पोहोचले आहेत, 33 दशलक्षाहून अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड केली गेली आहेत आणि देशभरात लाखो लसीकरण अपॉइंटमेंट बुक केल्या गेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT