FASTag New Rules and Regulations esakal
विज्ञान-तंत्र

FASTag New Rules : आजच FASTagचे नवीन नियम जाणून घ्या नाहीतर पस्तवाल

FASTag KYC Rules : FASTag चे नवीन नियम 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत.ते कोणते आहेत आणि KYC प्रोसेसबद्दल जाणून घ्या.

Saisimran Ghashi

FASTag Update : देशभरातील महामार्गांवर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि FASTag पेमेंट सिस्टीम अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नवीन नियमावली लागू केली आहे.

या नवीन नियमांमुळे FASTag वापरण्याचा अनुभव आणखी सोप्पा होईल आणि टोल भाडे भरण्याची प्रक्रिया वेगवान होईल. 1 ऑगस्ट 2024 पासून लागू असलेल्या या नियमांचा समावेश आहे.या नियमावलीमुळे फास्टाग वापरण्याचा अनुभव आणखी सुधारेल. चला तर जाणून घेऊया या नवीन नियमांबद्दल..

5 वर्ष जुने फास्टाग बदलणे आवश्यक: जुन्या नियमांनुसार जारी केलेले 5 वर्षापेक्षा जुने FASTag आता बदलणे आवश्यक आहे.

3 वर्ष जुने फास्टागसाठी KYC अपडेट: 3 वर्षांपूर्वी जारी केलेले फास्टाग वापरणाऱ्यांसाठी KYC माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे.

वाहन माहिती लिंक करणे: FASTag वापरणाऱ्यांनी त्यांच्या वाहनाचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि चेसिस नंबर FASTag खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

नवीन वाहन रजिस्ट्रेशन: नवीन वाहन खरेदी करताना 90 दिवसांच्या आत FASTag सिस्टीममध्ये रजिस्ट्रेशन क्रमांक अपडेट करणे आवश्यक आहे.

डेटाबेस व्हेरिफिकेशन: FASTag सेवा पुरवठादारांनी त्यांच्या डाटाबेसची वाहन राष्ट्रीय वाहन रजिस्ट्री मधील माहितीशी जुळवून घेणे आवश्यक आहे.

फोटो अपलोड करणे: फास्टाग वापरणाऱ्यांनी त्यांच्या वाहनाचा पुढचा आणि बाजूचा स्पष्ट फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

मोबाईल नंबर लिंक करणे: आता FASTag एखाद्या मोबाईल क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे जेणेकरून वापरणाऱ्यांना वेळी निश्चित सूचना आणि अपडेट्स मिळतील.

या नवीन नियमांचे पालन केल्याने देशभरातील टोल नाक्यांवर अखंड सेवा मिळेल असे NPCI ने नमूद केले आहे. फास्टागमुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक टोल वसुली व्यवस्थेत मोठे परिवर्तन झाले आहे. देशभरात सुमारे 1000 टोल नाक्यांवर आणि 45,000 किलोमीटर राष्ट्रीय महामार्गांवर आणि द्रुतगती मार्गांवर सध्या वापरकर्ता शुल्क वसूल केले जाते. 98% वापरकर्ता स्वीकृती आणि 80 दशलक्ष पेक्षा जास्त वापरणाऱ्यांसह FASTag देशातील इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीमध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT