इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणू शकते. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करत याबाबतचे संकेत दिले आहेत. 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता त्याची घोषणा होईल.
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिक स्वातंत्र्य दिनानिमित्त आपली पहिली इलेक्ट्रिक कार सादर करु शकते. कंपनीचे सीईओ भाविश आग्रवाल यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली यामध्ये ट्विटसोबत एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये बाजूला एक लाल कार दिसत आहे. आग्रवाल यांनी लिहिले होते की, "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 15 अगस्त दोपहर 2 बजे मिलते हैं।" त्यांच्या या ट्वीटमुळे चर्चांना उधाण आले आहे.
ओला 15 ऑगस्ट रोजी चारचाकी इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. वाहन निर्माता कंपनी पहिल्या इलेक्ट्रिक कारच्या अनावरणाच्या आधी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही ईव्ही एका चार्जवर किमान 500 किमी अंतर चालेल.
Tata Nexon EV Max आणि आगामी Mahindra XUV400 इलेक्ट्रिक यासह कोणत्याही प्रमुख कार निर्मात्यापेक्षा अधिक चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक वाहन लॉंच करण्याचा प्रयत्न असणार आहे. ओलाची ही इलेक्ट्रीक कार 2023 मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.
ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून टीझर शेअर केली आहे की 15 ऑगस्ट रोजी नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर होणार आहे. ही ओलाची नवीन इलेक्ट्रिक कार असल्याचे या टीझर व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. कंपनीने आपले कॉन्सेप्ट मॉडेल आधीच सादर केले आहे आणि ते कूपे-एस्क बॉडी स्टाइलमध्ये दिसत आहे. हे मॉडेल डिझाइनच्या बाबतीत, ते Kia EV6 सारखे दिसते. मात्र, त्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.