OLA Gig Electric Scooter Launch Specifications price details esakal
विज्ञान-तंत्र

OLA Gig Electric Scooter : ओलाचा धमाका! 40 हजारांपेक्षा कमी किंमतीत स्कूटर लाँच, एका चार्जिंगमध्ये धावणार 112 किलोमीटर

OLA Gig Electric Scooter Launch Specifications price details : ओला इलेक्ट्रिक कंपनीने Ola Gig आणि Gig Plus हे दोन नवीन कमर्शियल ई-स्कूटर्स लॉन्च केले आहेत.

Saisimran Ghashi

OLA Gig Commercial Electric Scooter : इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत क्रांती घडवणारी ओला इलेक्ट्रिक कंपनीने Ola Gig आणि Gig Plus हे दोन नवीन कमर्शियल ई-स्कूटर्स लॉन्च केले आहेत. व्यवसायिक वापरासाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या या स्कूटर्सची किंमत प्रामुख्याने ग्राहकांच्या बजेटला अनुसरून ठेवण्यात आली आहे. Ola Gig ची प्रारंभिक किंमत फक्त ₹40,000 आहे, तर Gig Plus ₹50,000 पासून सुरू होते.

Ola Gig आणि Gig Plus या स्कूटर्स कामासाठी मजबूत आणि टिकाऊ बनवल्या आहेत. दोन्ही स्कूटर्समध्ये काढता येणाऱ्या बॅटऱ्या (Removable Batteries) दिल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना चार्जिंगसाठी अधिक सोय मिळते.

Ola Gig

  • बॅटरी: सिंगल 1.5kWh बॅटरी

  • रेंज: 112 किमी प्रति चार्ज

  • मोटर: 250W

  • टॉप स्पीड: 25 किमी प्रति तास

  • डिझाईन: कमीतकमी डिझाइन, पुढील आणि मागील बाजूस सामान ठेवण्यासाठी रॅकची सुविधा

Ola Gig Plus

  • बॅटरी: दोन 1.5kWh बॅटऱ्या

  • रेंज: 157 किमी प्रति चार्ज

  • मोटर: 1.5kW

  • टॉप स्पीड: 45 किमी प्रति तास

  • डिझाईन: आकर्षक आणि आधुनिक लुक, अधिक रंगीत बॉडी क्लॅडिंग.

  • उत्तम इंधन बचत आणि कमी खर्च

सध्या पेट्रोलवर चालणाऱ्या सामान्य स्कूटर्सच्या तुलनेत, Ola Gig आणि Gig Plus यांची रोजची धावसंख्या जवळपास 93.4 टक्क्यांनी स्वस्त आहे. व्यवसायिक वापरासाठी ही स्कूटर्स स्वस्त आणि परवडणारी पर्याय ठरणार आहेत.

डिझाइन आणि ब्रेकिंग सिस्टम

दोन्ही स्कूटर्सना 12-इंची चाके,टेलिस्कोपिक फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग्स,ड्रम ब्रेक्स (सामोरासमोर) आहेत.

बुकिंग

ग्राहकांना या स्कूटर्सचे बुकिंग फक्त ₹499 मध्ये ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवरून करता येईल. एप्रिल 2025 पासून स्कूटर्सचे वितरण सुरू होईल.

कुणासाठी योग्य?

व्यवसायिक डिलिव्हरी सेवा, स्थानिक सामान वाहतूक, किंवा दैनंदिन व्यवसायिक वापरासाठी या स्कूटर्स सर्वोत्तम ठरतील. कमी खर्च, चांगली रेंज, आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे Ola Gig आणि Gig Plus ग्राहकांसाठी महत्त्वाचा पर्याय बनत आहेत.

ओला इलेक्ट्रिकने व्यवसायिक ई-वाहन क्षेत्रात आणलेला हा नवा बदल, ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT