oneplus 10t 5g launched in india with 150w charger check features specifications and price here  
विज्ञान-तंत्र

अखेर OnePlus 10T 5G भारतात लॉन्च; पाहा किंमत, स्पेसिफीकेशन्स

सकाळ डिजिटल टीम

OnePlus ने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10T 5G भारतात लॉन्च केला आहे. कंपनीने बुधवारी लॉन्च इव्हेंटमध्ये OnePlus 10T 5G लाँच करण्याची घोषणा केली. हा फोन भारतीय बाजारात Qualcomm च्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 150W सुपरवूक फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्याता आला आहे. OnePlus 10T 5G फोनमध्ये 16 GB LPDDR5 रॅम आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. चला जाणून घेऊया फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत...

OnePlus 10T5G मून ब्लॅक आणि जेड ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. फोनच्या 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेजची व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये आहे. त्याच वेळी, 12 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आणि 256 जीबी स्टोरेज 16 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 55,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 6 ऑगस्टपासून कंपनीच्या ऑनलाइन-ऑफलाइन स्टोअर आणि Amazon India वरून खरेदी करता येईल.

OnePlus 10T चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 सह उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो 1080x2412 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनची ब्राइटनेस 950 nits आहे आणि 2.5D कर्व्ड गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण डिस्प्लेवर उपलब्ध आहे. फोन HDR10+ सपोर्टसह येतो. OnePlus 10T मध्ये Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज 16GB पर्यंत LPDDR5 रॅम आहे.

OnePlus 10T 5G मधील कॅमेरा

OnePlus 10T 5G ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50-मेगापिक्सेल Sony IMX766 सेन्सर आहे. यासोबतच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि Nightscape 2.0 साठी देखील सपोर्ट दिला आहे. दुसरी लेन्स 8-मेगापिक्सेल Sony IMX355 अल्ट्रा वाईड आहे आणि तिसरी लेन्स 2-मेगापिक्सेल GC02M1 मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी, यात 16-मेगापिक्सलचा Samsung ISOCELL S5K3P9 सेन्सर आहे.

OnePlus 10T 5G ची बॅटरी

OnePlus 10T मध्ये 4800mAh ड्युअल सेल बॅटरी आहे, जी 150W सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरीबाबत कंपनीचा दावा आहे की, ही केवळ 19 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. कनेक्टिव्हिटीसाठी, OnePlus 10T 5G मध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.2, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT