OnePlus 11 5G Jupiter Rock Edition  esakal
विज्ञान-तंत्र

OnePlus 11 5G Jupiter Rock Edition : या स्पेशल एडिशन मध्ये आहेत खास गोष्टी

हँडसेट निर्माता OnePlus ने त्यांच्या ग्राहकांसाठी OnePlus 11 5G ज्युपिटर रॉक एडिशन लॉन्च केला

सकाळ डिजिटल टीम

OnePlus 11 5G Jupiter Rock Edition : हँडसेट निर्माता OnePlus ने त्यांच्या ग्राहकांसाठी OnePlus 11 5G ज्युपिटर रॉक एडिशन लॉन्च केला आहे. हा नवीन OnePlus 5G मोबाईल फोन एका युनिक डिझाईनसह लॉन्च करण्यात आला असल्याचं म्हटलं जात आहे. असं म्हणतात की, या नव्या वनप्लस स्मार्टफोनचं डिझाईन Solar System मधील Jupiter या ग्रहापासून इंस्पायर्ड होऊन तयार केलं आहे. आणि विशेष म्हणजे फोनच्या लिमिटेड युनिट्सची विक्री केली जाईल.

OnePlus 11 5G Jupiter Rock Edition Specifications

OnePlus 11 5G च्या या स्पेशल एडिशनचे फीचर्स OnePlus 11 च्या रेग्युलर मॉडेलसारखेच आहेत. जसं की, स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, क्वालकॉमचा Qualcomm चा लेटेस्ट आणि पॉवरफुल Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळेल. यासोबतच या डिवाइसमध्ये 16GB रॅम, 512GB इंटरनल स्टोरेज, 100W SuperVOOC फास्ट चार्ज सपोर्ट 5000mAh बॅटरी मिळेल.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झाल्यास तुम्हाला या फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, सोबत 48 मेगापिक्सलचा Sony IMX581 अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंसर आणि 32 मेगापिक्सेल Sony IMX709 टेलिफोटो कॅमेरा सेंसर मिळेल.

OnePlus 11 5G च्या फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा LTPO 3.0 AMOLED डिस्प्ले असून 120 Hz रिफ्रेश रेट आहे, जो Quad HD Plus रिझोल्यूशन ऑफर करतो. हा फोन 1300 nits पीक ब्राइटनेससह मिळेल.

OnePlus 11 Jupiter Rock Limited Edition ची किंमत

OnePlus ने OnePlus 11 5G स्मार्टफोनची ही स्पेशल एडिशन लॉन्च केली आहे, मात्र या एडिशनच्या किमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रॉक एडिशन व्यतिरिक्त हा फोन टायटन ब्लॅक आणि इटरनल ग्रीन कलरमध्ये विकला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT