oneplus 12 at indian market price specifications of smartphone earbuds Sakal
विज्ञान-तंत्र

Oneplus 12R : वन प्लस १२ची भारतात दमदार एंट्री

सकाळ वृत्तसेवा

- अनिल साबळे

नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन कंपनी वन प्लसने भारतात त्याचे दोन नवीन स्मार्टफोन लाॅन्च केले आहेत. येथील प्रगती मैदान येथे झालेल्या ग्लोबल इव्हेंटमध्ये कंपनीने आपले वन प्लस १२ आणि वन प्लस १२ आर हे स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले. यावेळी वन प्लस इअरबड्स-३ देखील लॉन्च करण्यात आले. हे फोन चीनमध्ये याआधीच लाॅन्च करण्यात आले आहेत.

वन प्लस '१२ आर'च्या आठ जीबी रॅमसह १२८ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किमत ३९,९९९ रुपये तर १६ जीबीरॅमसह २५६ जीबी व्हेरिएंटची किमत ४२, ९९९ रुपये आहे. दुसरीकडे 'वन प्लस १२'च्या १२ जीबी रॅमसह २५६ स्टोरेज असलेला व्हेरिएंट ६४,९९९ व १६ जीबी रॅमसह ५१२ स्टोरेजच्या व्हेरिएंटची किमत ६९, ९९९ रुपये आहे.

या दोन्ही फोनची प्री बुकींग सुरू झाली असून वन प्लस १२ आर ६ फेब्रुवारी तर वन प्लस १२ ची विक्री ३० जानेवारीपासून सुरू होईल. याफोनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे (आर्टिफ़िशियल इंटेलिजेंस) अनेक फिर्चस देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

वन प्लस १२ आरची वैशिष्ट्ये

- ६.७८ इंचाचा (एलटीपीओ) अमोलेड डिस्प्ले

- १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगसह ४५००निट्स ब्राइटनेस, २के रिजोल्युशन.

- चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन २

- ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचाअल्ट्रा वाइड अँगलची लेन्स आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स सोबत १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

- ५,४००एमएएचची बॅटरी

वन प्लस १२ वैशिष्ट्ये

- ६.८२ इंचाचा (एलटीपीओ) अमोलेड डिस्प्ले

- १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगसह ४५००निट्स, २के रिजोल्युशन

- चिपसेट स्नॅपड्रॅगन ८ जेन ३

- ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, Hasselblad-tuned कॅमेरा सिस्टम आहे. ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ४८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ३एक्स ऑप्टिकल झूमसह ६४ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा, ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

- ५,५००एमएएचची बॅटरी

वन प्लस इअरबड्स-३

वन प्लस इअरबड्स-३ मध्ये ग्राहकांना टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत. यामुळे गाणी ऐकताना अगदी सहज आवाज कमी-जास्त करता येणार आहे. यामध्ये तीन स्तरावर नाॅईस कॅंसिलेशनचा पर्यात देण्यात आला आहे. याशिवाय तब्बल ६.५ तासांच्या बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. त्यामुळे श्रोत्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय संगीताचा आनंद घेता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT