OnePlus 12 Smartphone Gets Huge Discount on Flipkart esakal
विज्ञान-तंत्र

Oneplus Smartphone Sale : खुशखबर! वनप्लसच्या 'या' ब्रँड स्मार्टफोनवर मिळतोय चक्क 11 हजारांचा डिस्काउंट,एकदा बघाच

Saisimran Ghashi

Oneplus Smartphone : स्मार्टफोन हा हल्ली प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे.आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल खूपच गरजेची वस्तु झाली आहे. अश्यात लोकांचा कल चांगला बजेटमध्ये असणारा,अनेक फीचर्स असणारा फोन खरेदी करण्याकडे असतो.याच स्मार्टफोन चाहत्यांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन OnePlus 12 ची किंमत एकदमच कमी झाली आहे. आता हा सुपरफोन फ्लिपकार्टवर 11 हजार रुपयांनी स्वस्त झालाय. हो तुम्ही बरोबर ऐकलत. या स्मार्टफोनवर बंपर सूट मिळत आहे.

वनप्लसने नेहमीच आपल्या दमदार फोनमुळे ग्राहकांचे मन जिंकले आहे. याच सीरिजमधील OnePlus 12 हा फोन देखील कमाल फीचर्स आणि जबरदस्त वर्कमुळे चर्चेत होता. पण आता त्याची किंमत कमी झाल्याने तो अधिकच आकर्षक झाला आहे.

या फोनमध्ये तुम्हाला सुपरफास्ट प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि सुंदर डिस्प्ले aanआणि यांच्यासारखी जबरदस्त वैशिष्ट्ये मिळतात. गेमिंगपासून ते मल्टीटास्किंगपर्यंत, हा फोन तुमच्या प्रत्येक गरजेला पूर्ण करेल.

ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर OnePlus 12 च्या दोन्ही व्हेरियंट्सवर ही जबरदस्त ऑफर मिळत आहे. या फोनवर तुम्हाला 11 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येऊ शकते.55 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा स्मार्टफोन मिळतोय.

फ्लिपकार्टवर OnePlus 12 च्या 256GB व्हेरिएंटची किंमत आधी 64,999 रुपये होती. पण आता यावर १४ टक्के डिस्काउंट मिळत आहे. याचा अर्थ, तुम्ही हा फोन फक्त 55,490 रुपयांना घरी आणू शकता. याशिवाय, HDFC बँक आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकच्या कार्डधारकांना अतिरिक्त ऑफर्स आणि विशेष डिस्काउंटही मिळत आहेत.

तर तुम्ही जर चांगल्या रेंजमध्ये एक बेस्ट स्मार्टफोन शोधत असाल तर OnePlus 12 हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. लगेच फ्लिपकार्टवर जाऊन या ऑफरचा लाभ घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT