OnePlus 12R Refund eSakal
विज्ञान-तंत्र

OnePlus 12R Refund : 'वनप्लस'चा नवीन फोन घेतलेल्या ग्राहकांना पूर्ण पैसे मिळणार परत! कंपनीची मोठी घोषणा.. काय आहे कारण?

Sudesh

OnePlus 12R Users to get full Refund : यावर्षीच्या पहिल्याच महिन्यात वनप्लसने आपली नवी स्मार्टफोन सीरीज लाँच केली होती. यामध्ये कंपनीने OnePlus 12 आणि OnePlus 12R असे दोन मोबाईल लाँच केले होतो. मात्र आता यातील वनप्लस 12R चं टॉप व्हेरियंट खरेदी केलेल्या ग्राहकांना कंपनी पूर्ण रिफंड देणार असल्याचं समोर येत आहे.

काय आहे कारण?

ज्या ग्राहकांनी OnePlus 12R चा 256GB स्टोरेज असणारा व्हेरियंट खरेदी केला आहे, त्या ग्राहकांना कंपनी फोनची पूर्ण किंमत परत देत आहे. याला कारण म्हणजे कंपनीने प्रॉमिस केलेलं फीचर या फोनमध्ये देण्यात आलेलं नाही. एबीपीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

वनप्लसच्या या फोनला दोन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आलं होतं. 8GB RAM + 128GB स्टोरेज असलेला बेस व्हेरियंट आणि 16GB+256GB असलेला टॉप व्हेरियंट. टॉप व्हेरियंटमध्ये UFS 4.0 स्टोरेज फीचर देण्यात आल्याचा दावा कंपनीने जाहिरातींमध्ये आणि लाँचवेळी केला होता. तसंच बेस व्हेरियंटमध्ये UFS 3.1 स्टोरेज असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं होतं.

फोन विकत घेतल्यानंतर ग्राहकांच्या लक्षात आलं, की वनप्लस कंपनीने आपल्या OnePlus 12R च्या टॉप व्हेरियंटमध्ये देखील UFS 3.1 स्टोरेज दिलं आहे. कंपनीच्या 11R आणि इतर कंपन्यांच्या कित्येक जुन्या फोनमध्ये हे फीचर उपलब्ध आहे. मग नवीन फोन आणि त्यातही टॉप मॉडेल घेण्याचा फायदा काय? असा सवाल ग्राहकांनी उपस्थित केला.

डॅमेज कंट्रोल

यानंतर वनप्लस कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीओओ किंडर लियू यांनी फोरम पोस्टमध्ये ग्राहकांची माफी मागितली. आमच्या कस्टमर सर्व्हिसला याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये त्रस्त झालेल्या ग्राहकांची आम्ही पूर्ण मदत करू, असं ते म्हणाले.

कस्टमर केअरशी साधा संपर्क

लियू यांनी ग्राहकांना कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. 16 मार्च 2024 पर्यंत ग्राहकांना पुढील स्टेप्स आणि रिफंड मिळवण्यास मदत केली जाईल. ग्राहकांनी धीर धरुन शांत राहिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो, असंही ते म्हणाले. (OnePlus 12R refund process)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT