Oneplus 13 5G mobile Video esakal
विज्ञान-तंत्र

Oneplus 13 Launch : एक झलक सबसे अलग! Oneplus 13 स्मार्टफोन लाँचआधीच व्हिडिओ झाला लिक; ब्रँड कॅमेरा अन् खास फीचर्स पाहाच

Oneplus 13 smartphone pre launch unboxing teaser video : वनप्लस कंपनीच्या आगामी OnePlus 13 5G या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे पहिली झलक कंपनीने जारी केलेल्या टीझर व्हिडिओद्वारे आणि एका अनबॉक्सिंग व्हिडिओमधून झाले आहे.

Saisimran Ghashi

Oneplus 13 Unboxing Teaser Video : वनप्लस कंपनीच्या आगामी OnePlus 13 5G या फ्लॅगशिप स्मार्टफोनचे पहिली झलक कंपनीने जारी केलेल्या टीझर व्हिडिओद्वारे आणि एका अनबॉक्सिंग व्हिडिओमधून झाले आहे. चीनमध्ये 31 ऑक्टोबर रोजी हा फोन अधिकृतपणे लाँच होणार असल्याची पुष्टी झाली आहे. अत्याधुनिक Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेटसह सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनला Snapdragon 8 Gen 3 ची जागा घेणार असल्याचे सांगितले जात आहे, ज्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

OnePlus 13 मध्ये तापमान नियंत्रणासाठी दुसऱ्या जनरेशनमधील ‘Tiangong’ कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामध्ये 9924mm² च्या व्हेपर कूलिंग चेंबरसह डबल लेयर 2K ग्राफाइट शीट आणि थर्मल कंडक्टिव्ह जेल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. कंपनीच्या मते, या कूलिंग सिस्टममुळे डिव्हाइसचे तापमान 7 अंश सेल्सियसपर्यंत कमी होऊ शकते.

OnePlus 13 चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स आकर्षक असून यात 6.82-इंचाचे 2K LTPO डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, आणि 4,500 निट्सपर्यंत ब्राइटनेस आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 50MP मुख्य, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा 3x ऑप्टिकल झूमसह दिला आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, 6,000mAh क्षमतेची बॅटरी, 50W वायरलेस आणि 100W वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळतो.

दरम्यान, Realme देखील भारतात त्यांचा नवीन GT 7 Pro फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. Qualcomm Snapdragon 8 Elite चिपसेटसह सुसज्ज असलेला भारतातील हा पहिला स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT