OnePlus 9rt 5g launched in india : OnePlus ने आपला नवीन स्मार्टफोन OnePlus 9RT भारतात लॉन्च केला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट 5G स्मार्टफोन दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, त्यामध्ये 8 GB + 128 GB आणि 12 GB + 256 GB या व्हेरिएंटचा समावेश आहे. 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या Amazon च्या ग्रेट इंडियन रिपब्लिक डे सेल मध्ये हा फोन खरेदी करता येईल. फोनमध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 120Hz डिस्प्लेसह अनेकदमदार फीचर्स आहेत.
OnePlus 9RT 5G चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 1080x2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.62-इंचाचा फुल HD + Samsung E4 AMOLED डिस्प्ले दिली आहे. हा डिस्प्ले 1300 nits च्या पीक ब्राइटनेस आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. कंपनी HDR10+ सपोर्टसह या डिस्प्लेमध्ये 1300Hz टच सॅम्पलिंग रेट देखील देत आहे.
हा OnePlus फोन 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजने सुसज्ज असून यात स्पेस कूलिंग टेकनॉलॉटजीसह प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.यात 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्ससह 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
फोनला पॉवर देण्यासाठी, 4500mAh बॅटरी दिली असून ती 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OS बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Android 11 वर आधारित OxygenOS 12 वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, 4G, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत.
किंमत
फोनच्या 8 GB रॅम वेरिएंटची किंमत 42,999 रुपये असून तुम्हाला त्याच्या 12 जीबी रॅम वेरिएंटसाठी 46,999 रुपये खर्च करावे लागतील. Amazon च्या सेलमध्ये तुम्हाला यावर चांगल्या ऑफर्स देखील मिळू शकतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.