oneplus nord ce 3 may launch soon with 120hz display check features specifications leaked  
विज्ञान-तंत्र

OnePlus Nord CE 3 : लवकरच येतोय वनप्लसचा खिशाला परवडणारा फोन; मिळणार 'हे' फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

OnePlus Nord CE 3 Features: OnePlus लवकरच त्याची स्वस्त स्मार्टफोन मालिका Nord CE चा लवकरच विस्तार करू शकते. असा दावा केला जात आहे की कंपनी या वर्षी जुलैमध्ये नवीन OnePlus Nord CE 3 लॉन्च करणार आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord CE 3 हा OnePlus Nord CE 2 चा उत्तराधिकारी म्हणून सादर केला जाईल. लॉन्च होण्यापूर्वीच या फोनची माहिती समोर आली आहे. मात्र, कंपनीने या फोनच्या लॉन्चबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

OnePlus Nord CE 3 ची संभाव्य फीचर्स

My Smart Price च्या रिपोर्टनुसार, OnePlus Nord CE 3 जुलैमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. OnePlus Nord 3 देखील जून ते जुलै दरम्यान लॉन्च केला जाऊ शकतो.

टिपस्टर स्टीव हेमरस्टोफर (@OnLeaks) नुसार, OnePlus CE 3 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्लेसह येईल. या फोनमध्ये 6.72 इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले मिळेल. आधी असे बोलले जात होते की हा फोन IPS LCD स्क्रीन सह सादर केला जाईल.

हेही वाचा - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

OnePlus Nord CE 3 चा संभाव्य कॅमेरा

रिपोर्टनुसार, OnePlus Nord CE 3 मध्ये octa-core Snapdragon 782G प्रोसेसर आणि 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असणे अपेक्षित आहे. आगामी OnePlus Nord CE 3 तीन रियर कॅमेऱ्यांनी सुसज्ज असू शकते.

फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल सेन्सर मिळण्याची अपेक्षा आहे.

OnePlus Nord CE 3 ची संभाव्य बॅटरी

लीकनुसार, फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी मिळेल. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल-बँड वाय-फाय, 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सपोर्ट असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT