OnePlus Nord CE4 vs Samsung Galaxy F55 Under ₹30,000 Detailed Comparison esakal
विज्ञान-तंत्र

Mobile Buying Tips : वनप्लस की सॅमसंग ₹30,000 पेक्षा कमी बजेटमध्ये बेस्ट स्मार्टफोन कोणता? जाणून घ्या

Saisimran Ghashi

Smartphone Guide : मिड-रेंज स्मार्टफोन शोधणाऱ्यांसाठी OnePlus आणि Samsung हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत. या दोन्ही कंपन्या कमीत कमी डिझाईन, जबरदस्त परफॉर्मन्स आणि दीर्घकालीन टिकाऊ असे उपकरण आणि मोबाईल देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आज आपण OnePlus Nord CE4 आणि Samsung Galaxy F55 यांची तुलना करणार आहोत आणि तुमच्यासाठी कोणता फोन बेस्ट आहे ते पाहणार आहोत.

डिझाईन आणि डिस्प्ले

दोन्ही फोनचा डिझाईन जवळपास सारखी असली तरी थोडीशी वेगळी आहे. OnePlus Nord CE4 प्लास्टिक बॅकसह सेलेडॉन मार्बल आणि डार्क क्रोम रंगांमध्ये येतो, तर Samsung Galaxy F55 व्हेगन लेदर बॅकसह रेझीन ब्लॅक आणि अॅप्रिकॉट क्रश रंगांमध्ये उपलब्ध आहे. Galaxy F55 हा दोन्ही फोनमध्ये FHD+ डिस्प्ले आहे ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आहे.

Nord ची स्क्रीन AMOLED आहे तर Galaxy ची सुपर AMOLED आहे. दोन्ही डिस्प्लेच्या वेगवेगळ्या फायद्या आहेत - Nord 2160Hz PWM डिमिंगसह येतो, ज्यामुळे कमी प्रकाशाच्या वातावरणात डोळ्यांवर जास्त लाईट पडत नाही. तर Galaxy चा डिस्प्ले अधिक तीक्ष्ण आणि चमकदार आहे. दोन्ही फोनमध्ये कस्टमाइजेबल ऑलवेज ऑन डिस्प्ले आहे. हा फोन वजनाने अतिशय हलका आहे (180 ग्रॅम) तर Nord CE4 186 ग्रॅम वजनाचा आहे.

परफॉर्मन्स

Nord CE4 मध्ये Snapdragon 7 Gen 3 चिपसेट 8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज आहे तर Galaxy F55 मध्ये Snapdragon 7 Gen 1 चिपसेट 8GB/12GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज आहे. हे दोन्ही फोन रोजच्या वापरासाठी उत्तम आहेत. Galaxy ला तुमच्या सवयींनुसार वापरायला थोडा वेळ लागेल पण एकदा सवय झाल्यावर तो निराश करणार नाही.

कॅमेरा

दोन्ही फोनच्या कॅमेऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर कोणत्याही एकाला A+ रेटिंग देता येणार नाही पण तरीही, निवड करायची झाली तर मी Galaxy F55 निवडणे योग्य राहील. Nord CE4 च्या फोटोंमध्ये थोडा निळसर रंग येतो. त्याचबरोबर, Samsung ट्रिपल कॅमेरा सेटअप देतो तर Nord ड्युअल कॅमेरा सेटअप देतो.

स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगायचे तर, Nord CE4 मध्ये 50MP sensor आणि 8MP अल्ट्रावाइड आहे. तर दुसरीकडे, Galaxy F55 मध्ये अतिरिक्त 2MP मॅक्रो लेंस आहे.

दोन्ही फोन Android 14 वर चालतात. Nord CE4 Oxygen OS 14 वर तर Galaxy F55 OneUI 6.1 वर. दोन्ही फोनमध्ये अतिशय क्लियर आणि सोपे युजर इंटरफेस आहे ज्यामध्ये खूप कमी ब्लोटवेअर आहे.

पण जर तुम्ही हा फोन दोन वर्षांपेक्षा जास्त वापरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Galaxy F55 निवडा ज्याला 4 वर्जन्समध्ये Android अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. Nord CE4 फक्त दोन वर्षांचे मेजर Android अपडेट्स आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देतो.

कोणता फोन निवडायचा?

Nord CE4 ची किंमत बेस मॉडेलसाठी ₹19,999 पासून ₹24,999 पर्यंत आणि टॉप मॉडेलसाठी ₹26,999 आहे. तर Galaxy F55 ची किंमत बेस मॉडेलसाठी ₹26,999, त्यापुढील मॉडेलसाठी ₹29,999 आणि टॉप मॉडेलसाठी ₹32,999 आहे.

शेवटी खरेदीचा निर्णय तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. घरातील इलेक्ट्रॉनिक्ससाठी रिमोट म्हणून फोन वापरण्याचा विचार असेल तर Nord CE4 चा विचार करा. पण तुम्हाला पेमेंट्स, कागदपत्रे जतन करण्यासाठी आणि स्मार्टवॉचसोबत वापरण्यासाठी फोन हवा असेल तर Galaxy F55 चा विचार करा. आता हे तुमच्या एकूण बजेट आणि आवडीनिवडीवर अवलंबून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT