Online Fraud esakal
विज्ञान-तंत्र

Online Fraud : काय असते रोमान्स स्कॅम? लाखोंचा गंडा पडण्याआधी ऑनलाइन डेटिंग करणाऱ्यांनी व्हा सावध

ऑनलाइन डेटिंग करणाऱ्या लोकांसाठी ही माहिती फार महत्वाची आहे

साक्षी राऊत

Online Fraud : हल्ली ऑनलाइन फ्रॉड वाढल्याच्या रोज नव्या बातम्या पुढे येतच असतात. हल्ली तरुणांमध्ये संवाद साधण्यासाठी आणि एकमेकांना ओळखण्यासाठी डेटिंग अॅप्स फार कॉमन आहेत. शिवाय झपाट्याने वाढत चाललेल्या रोमान्स स्कॅमचेही प्रकरण वाढतच चालले आहे. ऑनलाइन डेटिंग करणाऱ्या लोकांसाठी ही माहिती फार महत्वाची आहे. जाणून घेऊया सविस्तर.

काय असते रोमान्स स्कॅम?

एकाकी आणि श्रीमंत लोकांना त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पैसे फसवणार्‍यांना रोमान्स स्कॅमर म्हणतात. हे लोक आपल्या प्रेमाचे जाळे पसरवून ऑनलाइन डेटिंग करणाऱ्या श्रीमंत लोकांना फसवतात.

गेल्या काही वर्षांत डेटिंग अॅप्सच्या व्यवसायासोबतच रोमान्स स्कॅमच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही ऑनलाइन सोशल साइट्स किंवा डेटिंग अॅप्सवर अनोळखी व्यक्तींशी बोलत असाल तर तुम्हालाही धोका आहे. त्यामुळे हे स्कॅम्स तुमच्यासोबतही होऊ नये म्हणून खास काळजी घ्या.

Online fraud

रोमांन्स स्कॅमर्स

डेटिंग सोशल साईट्सवर असे अनेक लोक आहेत जे प्रेमाच्या जाळ्यात अडकवत पैशांची फसवणूक करतात. एखाद्याला टार्गेट करून त्याच्या संपर्कात येताच, शक्य तितक्या लवकर त्याच्याशी जवळीक वाढवणे हे त्याचे पहिले लक्ष्य असते. त्यात तो यशस्वी झाला की, त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी तो कोणत्या ना कोणत्या युक्त्या लढवतो.

त्याचप्रमाणे स्कॅमर मुलींना भेटून त्यांच्याशी लग्न करण्याचा विचारही करू लागतो. जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या मनात कोणतीही शंका उरणार नाही. पण प्रत्यक्षात असा कुठलाही त्यांचा हेतू नसतो. एकदा त्यांनी त्यांच्या टार्गेटकरून पैसे घेतले की ते कायमचेच गायब होतात.

तुमच्यासोबत रोमान्स स्कॅम होतोय हे कसं ओळखाल?

जर तुमचा ऑनलाइन पार्टनर कोणत्याही सोशल मीडियावर सक्रिय नसेल आणि तुम्हाला नेहमी न भेटण्याचा प्रयत्न करत असेल तर तो तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

अशा प्रकारचे घोटाळे करणारे लोक त्यांच्या कामात जास्तच परफेक्ट वाटतात. तो लगेच प्रेम व्यक्त करून तुमच्याशी लग्न करण्याचे वचनही देऊ शकतो. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची पूर्ण चौकशी करा.

स्कॅमर्सकडून तुमचे पैसे कसे वाचवाल?

तुम्हाला तुमच्या ऑनलाइन डेटिंग पार्टनरबद्दल काही शंका असल्यास, लगेच त्याच्याशी बोलणे थांबवा. तसेच, त्याच्यासोबत कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नका. आणि तुमचा विश्वास असलेल्या एखाद्याशी याबद्दल बोला.

एखाद्या व्यक्तीच्या प्रोफाइल फोटोचा ऑनलाइन शोध घ्या. तो कुठेही आक्षेपार्ह गोष्टीत गुंतला असेल तर त्याची थेट पोलिसांकडे तक्रार करा. (Scam)

रोमान्स स्कॅमपासून स्वत:चा असा बचाव करा

याप्रकारचे स्कॅम सहसा फक्त ऑनलाइन सोशल साइट्सवर होतात. त्यामुळे अशा घोटाळ्यांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी, तुमचे सर्व सोशल अकाउंट्स प्रायव्हेट ठेवा. (Dating App)

फिशिंग, रॅन्समवेअर आणि व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या डिव्हाइसचे सेफ्टी सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा. यासोबतच तुम्ही ज्या अनोळखी व्यक्तीशी ऑनलाइन बोलत आहात त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. आणि तुमचा कोणताही पर्सनल आणि फायनांशियल डेटा शेअर करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT