विजय देऊळगावकर
उन्हाळ्याच्या सुटीतील मनोरंजनाचे साधन म्हणून ‘सापशिडी’, ‘लूडो’, ‘तीन पत्ती’ हे ऑनलाइन गेम ओळखले जात होते. मात्र, इंटरनेटच्या युगात या खेळांना आता जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले. मोठ्या प्रमाणावर तरुणाई या ऑनलाइन जुगाराकडे आकर्षित झाली असून, यामध्ये किशोरवयीन मुलांचेही प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे स्कील गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ऑनलाइन गेममुळे अनेकांच्या आयुष्याचा ‘खेळ’ होत आहे.
ऑनलाइन जुगार ॲपची पद्धत
इंटरनेटच्या विविध साइटवर हे ॲप उपलब्ध आहेत. त्यावरून हे गेम डाउनलोड करण्यात येतात. ॲपवर आपला स्वतःचा आयडी तयार करावा लागतो. यासाठी दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात पूर्वीपासून त्यावर आयडी असलेली मंडळी नवीन युजर्सचे नाव आणि मोबाइल क्रमांक ॲपच्या ॲडमिनला रेफर करतात. यानंतर ॲडमिन युजर्सला संपर्क साधून त्याचा आयडी तयार करतो. दुसऱ्या प्रकारात जाहिरातींमध्ये दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती आयडी तयार करून देते.
डबल रकमेचे आमिष
आपल्या आयडीवर लॉगिन केल्यानंतर युजर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडू शकतो. यामध्ये त्याने जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट केली असेल, त्या प्रमाणात तो खेळू शकतो. जितकी रक्कम लावली, त्याच्या डबल रकमेचे आमिष खेळाडूला दाखविण्यात येते. यदाकदाचित युजर्स जिंकल्यास जिंकलेली रक्कम विड्रॉल करून घेऊ शकतो. यासाठी ॲपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते. या टीमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर युजर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. हरल्यास लावलेली रक्कम गमवावी लागते.
ऑनलाइन स्कील गेमच्या नावाखाली सुरू असलेले सर्व प्रकार अनधिकृत आहे. यावर प्रशासन कारवाई करू शकते. संगनमताने सुरू असलेल्या या जुगारामध्ये जो कोणी हा प्रकार चालवीत असेल, त्याला आरोपी करता येऊ शकते.- डॉ. कांचनकुमार चाटे, रिटायर्ड डीवायएसपी
युजर्सचा आयडी तयार झाल्यानंतर यामध्ये ॲपच्या नियमानुसार रक्कम डिपॉझिट करण्यास सांगण्यात येते. ही रक्कम जमा करण्यासाठी ॲपचा ॲडमिन क्यूआर कोड किंवा त्याचे बँक डिटेल पाठवितो. ही रक्कम जमा केल्यानंतर युजर्सला जुगार खेळता येतो. यामध्ये युजर्स १०० रुपयांपासून ते १० हजारांपर्यंत रक्कम डिपॉझिट करू शकतो.
सोशल मीडियाचे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप या प्लॅटफॉर्मवर; तसेच विविध चॅनलवर सध्या नियमित ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती दिसून येत आहेत. यामध्ये तीनपत्ती, जंगली रमी, लूडो तसेच क्रिकेटशी संबंधित खेळांच्या जाहिरातींचाही समावेश आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या जुगारांच्या खेळाकडे आकर्षित करून तरुणाईला भुरळ घालण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्कील गेमच्या नावाखाली युजर्स यात ओढले जातात. झटपट पैसे मिळविण्याच्या नादात तरुणाई या ऑनलाइन जुगाराकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.