Online Shopping Tips : आजकाल सर्व ठिकाणी एआयचा वापर सुरू झाला आहे. आपली कामं सोपी करण्यासाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर होतोय. यामुळेच कित्येक टेक कंपन्या आणि वेबसाईट्स आपल्या ग्राहकांसाठी एआय फीचर्स लाँच करत आहेत. लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाईट 'मिंत्रा'नेही आपल्या यूजर्सच्या मदतीसाठी एक एआय चॅटबॉट लाँच केला आहे.
मिंत्राच्या एआय चॅटबॉटचं नाव MyFashionGPT असं आहे. मिंत्रा ही ई-कॉमर्स साईट कपडे आणि अॅक्सेसरीजसाठी ओळखली जाते. संपूर्णपणे फॅशनसाठी डेडिकेटेड असणाऱ्या या प्लॅटफॉर्मवर आता तुम्हाला फॅशन टिप्स देखील मिळणार आहेत. मिंत्राचा हा एआय चॅटबॉट तुम्हाला शॉपिंग करताना फायद्याचा ठरेल.
माय फॅशन जीपीटी हा चॅटबॉट तुमच्या गरजेनुसार तुम्हाला योग्य असे कपडे सजेस्ट करतो. यामुळे लाखो ऑप्शन्समधून कपडे निवडण्यात तुमचा वेळ जात नाही.
यासाठी तुम्हाला MyFashionGPT मध्ये आपलं प्रॉम्प्ट एंटर करावं लागेल. म्हणजे, तुम्हाला जर कॉलेज फंक्शनसाठी एखादा आउटफिट हवा असेल, तर Show me men/women outfit for college function अशी आज्ञा या चॅटबॉटला देऊ शकता.
यानंतर हा चॅटबॉट तुम्हाला कपडे, फुटवेअर, अॅक्सेसरीज आणि मेकअप प्रॉडक्ट्सची देखील माहिती देईल.
हा चॅटबॉट वापरण्यासाठी तुम्हाला वेगळं अॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही. मिंत्राच्या अॅपमध्येच तुम्हाला हा चॅटबॉट मिळेल.
केवळ कपड्यांसाठीच नाही, तर अॅक्सेसरीज, मेकअप आणि इतर गोष्टींबाबत देखील तुम्ही या चॅटबॉटकडे टिप्स मागू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.