OpenAI Launches ChatGPT 4.o Mini esakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT Update : AIच्या दुनियेत OpenAI ने सगळ्यांना टाकले मागे; स्वस्त आणि शक्तिशाली 'ChatGPT 4.o Mini' लाँच करत रचला इतिहास

ChatGPT 4.o Mini Launch : जीपीटी-४ओ मिनी ही एक छोटी पण प्रभावी एआय प्रणाली आहे. या मॉडेलवर फक्त 15 पैसे (प्रति दहा लाख इनपुट टोकन्स) आणि 60 पैसे (प्रति दहा लाख आउटपुट टोकन्स) इतकाच खर्च येतो.

Saisimran Ghashi

OpanAI New Update : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) जगतात ओपनएआयने आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. ओपनएआय कंपनीने 'जीपीटी-४ओ मिनी' (ChatGPT 4o Mini) नावाचे नवीन आणि किफायतशीर एआय मॉडेल लाँच केला आहे. या मॉडेलमुळे एआय तंत्रज्ञान आता आणखी स्वस्त आणि सर्वांसाठी सुलभ होणार आहे.

जीपीटी-४ओ मिनी ही एक छोटी पण प्रभावी एआय प्रणाली आहे. या मॉडेलवर फक्त 15 पैसे (प्रति दहा लाख इनपुट टोकन्स) आणि 60 पैसे (प्रति दहा लाख आउटपुट टोकन्स) इतकाच खर्च येतो. त्यामुळे, जीपीटी-३.५ टर्बोसारख्या आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत हा मॉडेल खूपच स्वस्त आहे. यामुळे विविध क्षेत्रात एआयचा वापर करणं आता आणखी सोईस्कर होणार आहे.

जीपीटी-४ओ मिनीचे कामगिरीचे निकष खूपच प्रभावी आहेत. एमएमएलयू मार्कवर या मॉडेलने ८२ टक्के गुण मिळवले आहेत. तसेच, चॅट पसंतींबद्दलच्या एलएमएसवायएस लीडरबोर्डवर जीपीटी-४१ लाही मागे टाकलं आहे. स्वस्त आणि जलद प्रतिसाद देणारे असल्यामुळे हा मॉडेल विविध कामांसाठी उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, ग्राहक सेवा चॅटबॉट्स, मोठ्या प्रमाणात मजकूर हाताळणारे अॅप्लिकेशन्स आणि रिअल-टाइम मजकूर संवादासाठी हा मॉडेल उत्तम आहे.

सध्या जीपीटी-४ओ मिनी मजकूर आणि दृश्यात्मक इनपुट स्वीकारतो. पण भविष्यात यात इमेज, व्हिडिओ आणि ऑडिओ इनपुट आणि आउटपुटची सुविधा जोडली जाणार असल्याचे ओपनएआयने सांगितले आहे. या मॉडेलमध्ये १२८ हजार टोकन्सचा कॉन्टेक्स्ट विंडो आहे आणि ते एका वेळी १६ हजार टोकन्सपर्यंत आउटपुट देऊ शकते. या मॉडेलमधील माहिती ऑक्टोबर २०२३ पर्यंत अद्यतनित आहे. त्याचा सुधारित टोकानायझर परदेशी भाषांमधील मजकूर हाताळणे आणखी स्वस्त करतो.

हे मॉडेल शैक्षणिक आणि व्यावहारिक अशा दोन्ही क्षेत्रात उपयुक्त आहे. तर्कशास्त्र, गणित आणि कोडिंगच्या कामांमध्ये इतर छोट्या मॉडेल्सपेक्षा जीपीटी-४ओ मिनी अधिक चांगले काम करते. उदाहरणार्थ, एमजीएसएम आणि ह्युमनइव्हॅलसारख्या बेंचमार्कवरवर गणितीय तर्कात ८७ टक्के आणि कोडिंगमध्ये ८७.२ टक्के गुण मिळवून जीपीटी-४ओ मिनी आघाडीवर आहे.

ओपनएआयने जीपीटी-४ओ मिनीमध्ये सुरक्षिततेची अत्याधुनिक उपाययोजना राबवल्या आहेत. यामध्ये प्री-ट्रेनिंग दरम्यान हानीकारक मजकूर फिल्टर करणे आणि मॉडेलचे वर्तन सुरक्षा धोरणांशी जुळवून आणण्यासाठी मानवीय अभिप्रायासह बळकटीकरण शिकणे (आरएलएचएफ) यांचा वापर समाविष्ट आहे,असे कंपनीचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT