विज्ञान-तंत्र

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

ChatGPT नंतर आता OpenAI नवीन धमाका करण्यास सज्ज आहे.

रोहित कणसे

ChatGPT नंतर आता OpenAI नवीन धमाका करण्यास सज्ज आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, OpenAI गुगलच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी सर्च इंजिन लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

जिमी ऍपल्सने दावा केला आहे की OpenAI 9 मे रोजी एका भव्य कार्यक्रमात हे नाविन्यपूर्ण सर्च इंजिन सादर करणार आहे. कंपनीने या कार्यक्रमासाठी आवश्यक ते कर्मचारी नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे.

कसे असेल हे नवे सर्च इंजिन?

अंदाज वर्तवला जात आहे की OpenAI चं हे नवीन सर्च इंजिन Bing (new search engine open ai)च्या पायाभूत सुविधांवर आधारित असेल, जे मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजिन आहे. OpenAI च्या CEO, Sam Altman यांनी Lex Fridman च्या पॉडकास्टमध्ये या संभाव्यतेची पुष्टी करणारी माहिती दिली होती.

Google साठी ठरू शकत आव्हान -

हे OpenAI आणि Google मधील स्पर्धा अधिकाधिक वाढवू शकत. Google सध्या जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे; परंतु OpenAI च्या AI क्षमतेमुळे ते Google साठी आव्हान बनू शकतं.

OpenAI च्या नवीन सर्च इंजिन मध्ये असू शकतात हे फीचर्स -

ओपन एआयचं शक्तिशाली AI मॉडल अधिक प्रासंगिक आणि अचूक शोध परिणाम देऊ शकतं.

OpenAI वापरकर्त्याच्या गरजेनुसार शोध परिणाम (AI SEARCH RESULT) दर्शवण्यासाठी आणि अधिक पर्सनलाइज्ड एक्सपिरीयन्स देण्यासाठी AI चा वापर करू शकतं.

OpenAI गुगलच्या तुलनेत AI-संचालित अशी अनेक नवीन सर्च ऑप्शन (NEW SEARCH OPTIONS OPEN AI) देऊ शकतं.

OpenAI चं सर्च इंजिन Google ला कशी टक्कर देतं हे पाहणं मनोरंजक ठरेल. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, इंटरनेट वापरण्याच्या पद्धतीत नवीन क्रांती घडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT