ChatGPT AI-Detector Tool eSakal
विज्ञान-तंत्र

ChatGPT AI Detection : AIलाच कळेना कंटेंट ओरिजिनल की चॅटबॉटने लिहिलेला; ओपन एआयने डिटेक्टर फीचर केलं बंद!

Openai AI-Detection tool : हे एआय डिटेक्शन टूल खरंतर शिक्षण संस्थांसाठी तयार करण्यात येत होतं.

Sudesh

AI Detection Tool : चॅटजीपीटी हा एआय चॅटबॉट दाखल झाल्यापासून बरेच एआय टूल्स समोर आले आहेत. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणारे, ऑफिसचं काम करून देणारे आणि प्रसंगी होमवर्कही करून देणारे हे चॅटबॉट्स मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहेत. मात्र आता याबाबत एक मोठी अडचण समोर आली आहे.

नवीन आलेले हे एआय टूल्स एवढे परफेक्ट आहेत, की त्यांनी दिलेलं उत्तर हे खरोखरच एखाद्या व्यक्तीने दिलेलं वाटावं. यामुळेच एआयचं उत्तर आणि खरं उत्तर यात फरक करता येणं गरजेचं आहे. मात्र, असं करता येणं खुद्द चॅटजीपीटीलाही शक्य नसल्याचं समोर आलं आहे.

ओपन एआयने टेकले हात

चॅटजीपीटी बनवणारी ओपन एआय कंपनी एआय-जनरेटेड टेक्स्ट ओळखण्यासाठी एक टूल तयार करत होती. मात्र, या टूलची अचूकता त्यांना हवी तेवढी नसल्यामुळे गुपचूप हे टूल मागे घेण्यात आलं आहे. सध्या या टूलमध्ये सुधारणा करण्याचं काम सुरू असल्याचं ओपन एआय कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. (Tech News)

हे एआय डिटेक्शन टूल खरंतर शिक्षण संस्थांसाठी तयार करण्यात येत होतं. जेणेकरुन विद्यार्थ्यांनी एआयच्या मदतीने केलेली चीटिंग ओळखता यावी. या टूलच्या मर्यादा ओपनएआयने आधीच सांगितल्या होत्या. तसंच, शिक्षकांनी पूर्णपणे या टूलवर विसंबून राहू नये असंही कंपनीने म्हटलं होतं. (ChatGPT AI Detection Tool)

जगासाठी धोक्याची घंटा

जगभरातील शाळांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये Turnitin नावाचं एक टूल एआय टेक्स्ट-डिटेक्शनसाठी वापरलं जातं. मात्र, हे टूलही बऱ्याच वेळा चुकत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता ओपन एआयला सुद्धा स्वतःच्याच चॅटजीपीटीने तयार केलेला कंटेंट ओळखणं अवघड झालं आहे. नवनवीन प्रकारचे एआय टूल्स दररोज समोर येत असताना, अशा प्रकारचं डिटेक्टर उपलब्ध नसणं ही सर्वांसाठीच एक धोक्याची घंटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT