OpenAI  esakal
विज्ञान-तंत्र

OpenAI : चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार का?

साधारण गेल्या काही काळापासून चॅट जीपीटीवरून जगभरात उलट-सुलट चर्चा सुरु

सकाळ डिजिटल टीम

OpenAI : साधारण गेल्या काही काळापासून चॅट जीपीटीवरून जगभरात उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रातही नवी क्रांती आल्याचं बोललं जात आहे. पण त्यासोबतच चॅट जीपीटीबाबत चिंताही व्यक्त केली जात आहे.

सद्यस्थितीत प्रत्येक कंपनी आपल्या AI च्या (Artificial Intelligence) निर्मितीवर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. पण चॅट जीपीटीनं सर्वाचंचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे अनेकांना चॅट जीपीटीबाबत आकर्षणही निर्माण झालं आहे.

त्याच्या चकीत करणाऱ्या रिझल्ट्समुळे लोकांना अधिक गांभीर्याने विचार करण्यास भाग पाडलं आहे. अशातच OpenAI आता चॅट जीपीटी 5 लाही ट्रेन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात बोलताना कंपनीचे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी मोठा खुलासा केला आहे.

चॅट जीपीटी विकसित करणारी कंपनी OpenAI नं दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी अत्यंत कुशल असं जीपीटी-4 लॉन्च केल्यानंतर कंपनी आता जीपीटी 5 ला ट्रेन करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही.

काय आहे ChatGPT?

ओपन एआय या कंपनीचं ChatGpt हे एक चॅटबॉट आहे. जे गुगलपेक्षाही प्रगत सर्च इंजिन आहे. गेल्या काही काळापासून खळबळ उडवून देणाऱ्या ओपन एआयच्या चॅटजीपीटीवर लोकांनी विचारलेल्या प्रश्नांवर अचूक, मोजकी आणि योग्य माहिती मिळते. गुगलपेक्षाही वेगानं चॅट जीपीटी तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी झटपट देतं. हेच कारण आहे ChatGpt कमी काळात लोकप्रिय होण्यामागे.

OpenAI चे सीईओ सॅम अल्टमॅन यांनी MIT मध्ये एका इव्हेंटमध्ये बोलताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. या इव्हेंटमध्ये एलॉन मस्क यांच्यासह इतर टेक कम्युनिटी मेंबर्सनी सह्या करुन दिलेल्या एका ओपन लेटरबाबात त्यांना विचारण्यात आलं. या ओपन लेटरमध्ये टेक कम्युनिटी मेंबर्सनी GPT-4 पेक्षाही विकसित AI सिस्टिम तयार करण्यास रोख लावण्यात यावी, अशी मागणी केली होती. याला अनुसरुनच अल्टमॅन यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना त्यांची कंपनी GPT-5 ला ट्रेन करण्यासंदर्भात कोणतही काम करत नसल्याचं सॅम अल्टमॅन यांनी सांगितलं.

सद्यस्थितीत जवळपास 10 कोटींपेक्षा अधिक सक्रिय फॉलोअर्स आहेस. या चॅटबॉटचा आवाका जास्त असला तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि रोजगाराच्या बाबतीत भीती निर्माण केली जात आहे. तसेच चॅटजीपीटीमुळे व्यक्तीच्या खाजगी आयुष्यातील माहितीही अगदी सहज गोळा केली जाऊ शकते, अशी भितीही व्यक्त केली जात आहे. यावर सीईओ सॅम अल्टमॅन यांना एमआयटीच्या इव्हेंटमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. ही भीती दूर करण्यासाठी त्यांच्याकडून AI जास्तीत जास्त सुरक्षित कसं राहिल, यासाठी काम केलं जात आहे, असंही सांगण्यात आलं आहे.

AI लॉन्च झाल्यापासून त्यासंदर्भात वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. तसेच याच्या अफाट क्षमतेमुळे त्याचा अनेक क्षेत्रांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यावर एलॉन मस्क यांच्याकडून AIच्या ChatGpt विकासावर बंदी घालण्यात यावी, म्हणून टेक कम्युनिटी मेंबर्सनी एक ओपन लेटर साईन केलं होतं.

मात्र, यावर एमआटीच्या एका इव्हेंट दरम्यान एआयचे सीईओ सॅम अल्टमॅन यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी या पत्राशी सहमत नसल्याचं सांगितलं. तसेच, त्या पत्रात करण्यात आलेले दावेही त्यांनी फेटाळून लावेल आहेत. तसेच, ओपन लेटरमध्ये चॅट जीपीटीबाबतच्या अनेक सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचंही अल्टमॅन म्हणाले.

सॅम अल्टमॅन यांनी पुढे बोलताना AI ChatGpt-5 संदर्भात कोणतंही काम करत नसल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तसेच यापुढे कंपनीकडून एआयसह ChatGpt-4 बाबत ज्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचंही अल्टमॅन यांनी सांगितलं.

यासोबत चॅट जीपीटीच्या खास सुरक्षिततेवरही अधिक काम केलं जाणार असल्याचं अल्टमॅन यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे अल्टमॅन यांच्या बोलण्यावरुन सध्या तरी चॅट जीपीटी-4 चंचं अपडेटेड व्हर्जन पुन्हा एकदा नव्यानं समोर येऊ शकतं यात शंकाच नाही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT