तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर एक चांगली बातमी आहे. ओप्पोने काही दिवसांपूर्वीच आपला एफ२३ ५जी हा जबरदस्त फोन लाँच केला होता. आजपासून या फोनवर तब्बल ४ हजार रुपयांची सूट मिळत आहे. दुपारी १२ वाजेपासून हा सेल सुरू होईल.
काय आहेत फीचर्स
ओप्पोचा F23 5G हा स्मार्टफोन ५जी नेटवर्कला सपोर्ट करतो. यामध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असणारी मोठी स्क्रीन मिळते. ६४ मेगा पिक्सल प्रायमरी कॅमेरा असणारा एक ट्रिपल कॅमेरा सेटअप या फोनमध्ये देण्यात आला आहे. सेल्फी घेण्यासाठी फ्रंट कॅमेरा हा तब्बल ३२ मेगापिक्सलचा आहे.
या फोनमध्ये ५००० mAh क्षमतेची तगडी बॅटरी मिळते. तर, हा फोन ६७W सुपरव्हूक चार्जिंगला सपोर्ट करतो. विशेष म्हणजे चार्जर फोनसोबतच मिळतो. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेसह उपलब्ध आहे. यासोबतच फोनमध्ये ८ जीबी एक्स्पँडेबल रॅमही देण्यात आलेली आहे.
किती मिळणार डिस्काउंट?
८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असणाऱ्या ओप्पो एफ२३ ५जी फोनची किंमत २८,९९९ रुपये आहे. मात्र, आजपासून सुरू होत असणाऱ्या सेलमध्ये या फोनवर सुमारे चार हजार रुपयांची सूट मिळते आहे. म्हणजेच हा फोन तुम्ही २४,९९८ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
हा सेल अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर सुरू होणार आहे. तर, ओप्पोच्या ऑफिशिअल वेबसाईटवर देखील आजपासून हा फोन सवलतीत खरेदी करू शकता.
बँक ऑफरही उपलब्ध
अमेझॉनवर ओप्पोचा हा फोन विकत घेण्यासाठी बँक ऑफर आणि ईएमआय असे पर्यायही देण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड, किंवा एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास यावर २,५०० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.
तुम्हाला ईएमआयवर जर हा फोन घ्यायचा असेल, तर तो पर्यायही अमेझॉनवर दिलेला आहे. १,१९४ रुपयांच्या ईएमआयवर तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकता. विशेष म्हणजे, ईएमआयसाठी जर तुम्ही येस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरले, तर त्यावर तुम्हाला ७५० रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तेव्हा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही संधी सोडू नका.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.