फ्लिपकार्ट या शॉपिंग प्लॅटफॉर्मवर बिग दिवाळी सेलमध्ये लाखो ग्राहकांनी दिवाळीनिमीत्त खरेदी केली आहे. मात्र आता मंगळूर, कर्नाटक येथे राहणाऱ्या एका ग्राहकाने दावा केला आहे की त्याने या सेल दरम्यान गेमिंग लॅपटॉप खरेदी केला होता परंतु लॅपटॉपऐवजी त्याला मोठा दगड आणि ई-कचरा डिलीव्हर करण्यात आला. मागील काही दिवसांपासून अशाप्रकारच्या फसवणुकीची प्रकरणे वारंवार समोर येत आहेत आणि यामुळेच ई-कॉमर्स साइट्स 'ओपन बॉक्स डिलिव्हरी' सारख्या सुविधा देत आहेत.
चिन्मय रमणा नावाच्या ग्राहकाचा दावा आहे की, त्याने 15 ऑक्टोबर रोजी त्याच्या मित्रासाठी Asus TUF गेमिंग F15 गेमिंग लॅपटॉप ऑर्डर केला होता आणि त्याच्याकडे Flipkart Plus सदस्यत्व देखील आहे. 20 ऑक्टोबर रोजी तो सीलबंद बॉक्समध्ये डिलीव्हर केला गेला. दरम्यान हा बॉक्स उघडल्यावर गेमिंग लॅपटॉपऐवजी दगड आणि कचरा सापडल्याचा दावा केला जात आहे. ग्राहकांनी अनेक फोटो देखील शेअर केले आहेत.
ग्राहकाकडून मोठी चूक
फ्लिपकार्टने अलीकडेच ग्राहकांसाठी 'ओपन बॉक्स डिलिव्हरी' सिस्टीम सुरू केली आहे, ज्यामुळे ग्राहक ठरवू शकतात की ऑर्डर केलेले प्रॉडक्टच त्यांना मिळत आहे का ते तपासू शकतात. डिलिव्हरी एजंटला मेसेजवर मिळालेला OTP पास करण्यापूर्वी, ग्राहक त्याला बॉक्स उघडण्यास सांगू शकतो आणि योग्य उत्पादन वितरित केले गेले आहे हे तपासू शकतो. चिन्मयने बॉक्स न उघडताच डिलिव्हरी घेतली आणि तो ओटीपी एजंटला दिला, ही चूक तुमच्याकडून देखील होऊ शकते. त्यामुळे अशा फसवणूकीपासून बचावासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत.
प्रॉडक्ट सेलरचा चूक मान्य करण्यास नकार
ग्राहकाला बॉक्समध्ये दगड सापडल्यानंतर, त्याने त्वरित सेलरला याची माहिती दिली आणि रिटर्न रिक्वेस्ट देखील पाठवली, तरीही विक्रेत्याने ती विनंती मान्य केली नाही. विक्रेत्याने असे म्हटले आहे की उत्पादन त्याने पाठवले तेव्हा बॉक्समध्ये होते आणि अशा परिस्थितीत कोणताही रिफंड किंवा रिटर्न केले जाऊ शकत नाही. या प्रकरणाची चौकशी करून फ्लिपकार्ट त्याला लवकरात लवकर मदत करेल आणि रिफंड पाठवेल अशी चिन्मयला आशा आहे.
दरम्यान काही मिडीया रिपोर्ट्सनुसार चिन्मयने सांगितले की, मी फ्लिपकार्टला सर्व पुराव्यांसह फसवणूकीची माहिती दिली त्याच दिवशी त्यांनी सांगितले की त्यांना तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वेळ लागेल. 23 ऑक्टोबर रोजी मला एक ईमेल पाठवून सांगण्यात आले की विक्रेत्याने रिटर्न रिक्वेस्ट नाकारली आहे आणि वाहतूक दरम्यान उत्पादनाचे कोणतेही नुकसान झाले नाही. चिन्मयचा दावा आहे की उत्पादनाच्या बॉक्सवरील बारकोड खराब झाला होता आणि त्याच्या डीटेल्सशी संबंधीत स्टिकर्स काढून टाकण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.